सत्तेत येताच धामी सरकारचा मोठा निर्णय ; देशातलं पहिलं राज्य ठरलं! आश्वासन पूर्ण

समान नागरी संहिता (uniform civil code) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीत कायदेतज्ज्ञांचा समावेश असेल.
 Pushkar Singh Dhami
Pushkar Singh Dhamisarkarnama

डेहराडून : भाजपने उत्तराखंडमध्ये गुरुवारी सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या मंत्रीमंडळाची काल पहिली बैठक झाली. या बैठकीत एक महत्वाचा निर्णय धामी सरकारनं घेतला.

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर राज्यातील भाजप (BJP) सरकारने गुरुवारी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील पुष्कर सिंह धामी (CM Pushkar Singh Dhami) सरकारने बैठकीत समान नागरी संहिता म्हणजेच समान नागरी संहिता (uniform civil code) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीत कायदेतज्ज्ञांचा समावेश असेल.

 Pushkar Singh Dhami
शाळेबाबत राज्य सरकारने घेतला महत्वाचा मोठा निर्णय

''मुख्यमंत्री धामी म्हणाले, ''राज्यात समान नागरी संहिता लागू करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मंत्रिमंडळाने हा निर्णय एकमताने घेतला, असे करणारे उत्तराखंड हे पहिले राज्य आहे,'' आता लवकरात लवकर समिती स्थापन करून ती राज्यात लागू केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री धामी यांनी सांगितले.

धामी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतीय जनता पक्ष संघटनेने मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना सरकारचे व्हिजन लेटर सुपूर्द करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक आणि प्रदेश सरचिटणीस संघटन अजय कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र सुपूर्द केले.

 Pushkar Singh Dhami
पटोलेंना 'अमजद खान' म्हणणं शुक्लांना पडलं महागात ; 500 कोटींचा मानहानीचा दावा दाखल

समान नागरी संहिता (युनिफॉर्म सिव्हिल कोड) म्हणजे भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी समान कायदा. माणूस कोणत्याही धर्माचा, जातीचा असो. समान नागरी संहितेअंतर्गत सर्व धर्मांना विवाह, घटस्फोट आणि मालमत्तेच्या विभाजनाबाबत कायदा लागू होईल. हा धर्मनिरपेक्ष कायदा आहे, जो सर्वांना समान लागू होतो.

पुष्कर सिंह धामी यांनी बुधवारी उत्तराखंडचे 12वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. धामी यांच्यासह आठ मंत्र्यांनीही शपथ घेतली. डेहराडून येथील परेड ग्राऊंडवर झालेल्या शपथविधी समारंभात राज्यपालांनी सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com