Udhav Thackeray
Udhav Thackeraysarkarnama

शाळेबाबत राज्य सरकारने घेतला महत्वाचा मोठा निर्णय

यापुढे रविवारीही शाळा सुरु ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

मुंबई : राज्यात कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात येत असताना राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबत एक परिपत्रक काढले आहे. . सरकारच्या या निर्णयानंतर तब्बल दोन वर्षांनी पहिल्यांदाच शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत.

कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण देशात शाळा बंद होत्या. राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथिल करून शाळा सुरु (schools open in Maharashtra) करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही पर्याय देण्यात आले होते. आता राज्यातील सर्व शाळा 100 टक्के उपस्थितीसह पूर्णवेळ सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

Udhav Thackeray
पटोलेंना 'अमजद खान' म्हणणं शुक्लांना पडलं महागात ; 500 कोटींचा मानहानीचा दावा दाखल

गुरुवारी काढण्यात आलेल्या या परिपत्रकात आता यापुढे रविवारीही शाळा सुरु ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. राज्यातील सर्व शाळा 100 टक्के उपस्थितीसह पूर्णवेळ सुरू (100 % Schools Opened in Maharashtra) करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्या नेतृत्त्वातील सरकारने परवानगी दिली आहे. याशिवाय एखाद्या शाळेला रविवारी शाळा भरवायची असेल तर त्यासाठी देखील परवानगी असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Udhav Thackeray
जुन्नरचे नगराध्यक्ष पांडे राष्ट्रवादीच्या गळाला? बेनकेंच्या फेसबूक पोस्टमुळे शिवसैनिक नाराज

शाळा शनिवारी पूर्णवेळ शाळा सुरू ठेवाव्यात, असे देखील आदेशात म्हटले आहे. त्याचबरोबर रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सुरू ठेवण्याची परवानगी असेल, असे देखील सांगण्यात आले आहे.विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात होते. परंतु काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे दिसत आहे. कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. त्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com