Politics : अर्थसंकल्पावर घेतलेल्या पत्रकार परिषदेतही नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना सोडले नाही

Narayan Rane : नारायण राणे पत्रकारांवर का भडकले?
Narayan Rane
Narayan Rane Sarkarnama
Published on
Updated on

Union Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर केला आहे. मंत्री सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत अर्थसंकल्पावर भाष्य केलं.

तसेच या अर्थसंकल्पामधून देशासह राज्याला काय-काय मिळालं? हे त्यांनी सांगितलं. मात्र, अर्थसंकल्पावर घेतलेल्या पत्रकार परिषदेतही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना सोडले नाही. ''मुंबई यांनी इतकी लुटली की यू आणि आर नावाने हप्ते जायचे'', असे म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले.

Narayan Rane
Budget 2023 News : हा अर्थसंकल्प म्हणजे 'चुनावी जुमला'च ; अजित पवार बरसले..

तसेच यावेळी राणे पत्रकारांवरही भडकल्याचे पाहायला मिळाले. नारायण राणे म्हणाले, ''येणाऱ्या आगामी निवडणुकीत मुंबईत आम्ही भाजपची सत्ता आणणार म्हणजे आणणारच. याचे कारण म्हणजे शिवसेनेने मुंबईला लुटलं आहे. पण आता बस्स झालं, यांनी मुंबईला इतकं लुटलं की 'यु' आणि 'आर' नावाने हप्ते जात होते. मुंबईला यांनी विदृप करुन टाकलं आहे'', असं म्हणत त्यांनी नाव न घेता ठाकरेंवर गंभीर आरोप केले.

Narayan Rane
Raju Shetti News : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर राजू शेट्टी नाराज; म्हणाले...

''आम्ही मुंबईसाठी तरतूद करत आहोत. तसेच मुंबईसाठी तरतूद करायला आम्ही लावू. मुंबईला कोणत्याही प्रकल्पासाठी पैसे लागले तर आम्ही ते उपलब्ध करून देऊ. यासाठी ते आमचे ऐकतील एवढा आम्हाला विश्वास आहे'', असं राणे यावेळी म्हणाले.

Narayan Rane
Kasaba Election : कुणाल टिळकांना थेट फोन आला, तुमचं तिकिट भाजपनं फायनल केलं अन् नंतर वेगळंच घडलं !

नारायण राणे पत्रकारांवर का भडकले?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पत्रकारांनी पेट्रोल आणि गॅस सिलिंडर दरवाढीवरून प्रश्न विचारला. यानंतर मात्र राणे यांनी पत्रकारांना थेट शिवसेनेचे प्रवक्तेच म्हटलं.

''तुम्ही पत्रकार नाही तर सोशल वर्कर झाला आहात. नाहीतर शिवसेनेचे प्रवक्ते झाले आहात'', असं राणे म्हणाले. मात्र, यावर पत्रकारांनी आक्षेप घेतला. तसेच प्रश्न विचारल्याने कोणी प्रवक्ते होतं का? प्रश्न विचारणे आमचे काम असल्याचे यावेळी त्यांना सांगितलं. पण यामुळे काही वेळ पत्रकार आणि नारायण राणे यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झालेली पाहायला मिळाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com