Manoj Jarange Patil : राज ठाकरेंचा मनोज जरांगे-पाटलांना सल्ला; म्हणाले, 'आता फक्त आरक्षण...'

Raj Thackeray On Manoj Jarange Patil Morcha: 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारा, म्हणजे आपल्या मराठाबांधवांना आणि भगिनींना खरी परिस्थिती समजेल...'
Raj Thackeray and Manoj Jarange Patil
Raj Thackeray and Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या वेशीवर जाऊन धडकलेल्या मराठाबांधवांच्या आंदोलनाला अखेर यश आलं. मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः अधिसूचनेची प्रत लाखो मराठाबांधवांच्या साक्षीने जरांगे-पाटील यांना दिली. (Raj Thackeray On Manoj Jarange Patil Morcha)

जरांगे-पाटील यांच्या सर्व प्रमुख मागण्या राज्य सरकारकडून मान्य झाल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळातूनदेखील प्रतिक्रिया येत आहेत. याअनुषंगानेच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील प्रतिक्रिया देत मनोज जरांगे-पाटील यांचं अभिनंदन केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार आहे, हेदेखील एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना विचारा, म्हणजे आपल्या मराठाबांधवांना आणि भगिनींना खरी परिस्थिती समजेल, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांच्या ट्विटनंतर त्यांचा नेमका रोख कुणाकडे आहे, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

राज ठाकरे ट्विटमध्ये नेमकं काय म्हणाले ?

"श्री. मनोज जरांगे-पाटील यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे आपल्या मराठाबांधवांना, भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल! लोकसभा निवडणुकीआधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा!" असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

R...

Raj Thackeray and Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Morcha: 'मनोज जरांगे-पाटील तुम्हाला माझा सलाम...'; खासदार इम्तियाज जलील यांचं भावुक ट्विट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com