सुशांतची हत्याच अन् मातोश्रीवरील चौघांना लवकरच ईडीची नोटीस! राणेंनी टाकला बॉम्ब

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आज ट्विटबॉम्ब टाकत मोठी खळबळ उडवून दिली आहे.
Narayan Rane
Narayan Rane sarkarnama

मुंबई : मुंबई महापालिकेने (BMC) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना नोटीस बजावली आहे. राणे यांच्या जुहू येथील 'अधिश' या बंगल्याची अंतर्गत तपासणी आणि मोजमाप करण्यासाठी ही नोटीस देण्यात आली आहे. यावर आता राणेंनी ट्विट करीत थेट मातोश्रीतील चौघांना सक्तवसुली संचालनालयाची (ED) नोटीस मिळणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. याचबरोबर अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि त्याची मॅनेजर दिशा सॅलियन (Disha Sallian) यांची हत्या झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

राणेंनी आज ट्विटबॉम्ब टाकत मोठी खळबळ उडवून दिली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील सत्य दोन वर्षे पूर्ण होत असतानाही अद्याप बाहेर आलेले नाही. त्याची मॅनेजर दिशा सॅलियनने दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. सुशांत प्रकरणातील गूढ अद्याप केंद्रीय अन्वेषण विभागाला उलगडता आलेले नाही. असे असतानाही राणेंनी सुशांतची हत्या तर दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचे समोर येईल, असे म्हटले आहे.

मातोश्रीवरील चौघांना लवकरच ईडीची नोटीस बजावण्यात येईल, असा गौप्यस्फोटही राणेंनी केला आहे. राणेंनी ट्विटरवर म्हटले आहे की, खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी. लवकरच सुशांतसिंह व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल. एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस ” आणि आपण कुठे धावणार ?

Narayan Rane
सोमय्यांच्या आरोपावर अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी अखेर सोडलं मौन

दरम्यान, नारायण राणेंच्या अधिश बंगल्याबाबत बांधणीसाठी सादर केलेल्या प्लॅनमध्ये बदल करत बंगल्याचे बांधकाम करण्यात आल्याची तक्रार महापालिकेला २०१७ मध्ये मिळाली होती. या बंगल्याचे बांधकाम हे 'सीआरझेड'चे उल्लंघन असल्याबाबतची तक्रार आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने ही नोटीस बजावण्यात आली आहे. 'के' वेस्ट वॉर्डकडून ही नोटीस देण्यात आली आहे. बंगल्याच्या आतील काही बांधकाम विनापरवाना करण्यात आले आहे का? याची महापालिका पाहणी करणार आहे.

Narayan Rane
नारायण राणेंचं धक्कातंत्र! मतदार यादीतून नाव वगळूनही मुलगा जिल्हा बँकेवर संचालक

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना (shivsena) भवनात पत्रकार परिषद घेत, भाजप नेत्यांवर आरोप केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नारायण राणे यांनी शिवसेनेला आणि राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. संजय राऊत हा पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा माणूस आहे. त्यामुळे शरद पवारांच्या सहकार्याने ते मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहत असल्याची टीका राणे यांनी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com