महाविकास आघाडीतही नाराजीनाट्य; शिवसेनेने 'तो' निर्णय परस्पर घेतला... काँग्रेसचा आरोप

Shivsena | Congress | NCP : खासदार अरविंद सावंतांचे अशोक चव्हाण यांना प्रत्यूत्तर...
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : एका बाजूला शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळात विस्ताराचे वारे वाहत असतानाच दुसऱ्या बाजूला शिवसेनेने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी आमदार अंबादास दानवे यांची निवड केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Marathwada) यांच्याकडून विश्वासू दानवेंवर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिंदेंच्या बंडानंतर अंबादास दानवे यांनी शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, कार्यकर्ते आणि सामान्य शिवसैनिक एकनिष्ठ राहण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. वार्डात, शहरात, गावात बैठका घेत संघटनेचा आढावा आणि फेरबांधणी केली.

परिणामी बंडखोर आमदार व त्यांच्या निवडक समर्थकांशिवाय मुळ शिवसेनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षासोबतच राहिले. शिवाय बंडखोरांकडून होणाऱ्या टीकेला जशास तसे उत्तरही दिले. याचेच बक्षिस म्हणून उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दानवे यांच्यावर सोपवली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, दानवे यांच्या निवडीवरुन महाविकास आघाडीमध्ये मात्र वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेसने दानवे यांच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे.

Mahavikas Aghadi
Shivsena : विरोधी पक्षनेते झाल्यानंतर दानवेंची बंडखोर बोरनारेंच्या मतदारसंघातून एन्ट्री..

नाराजी व्यक्त करताना काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस इच्छुक होती. परंतु आम्हाला न विचारताच शिवसेनेने परस्पर हा निर्णय घेतला. त्यामुळे काँग्रेसमध्ये याबाबत स्वाभाविक नाराजी आहे. तर ज्यांचा आकडा मोठा त्यांनाच विरोधी पक्षनेतेपद, विधान परिषदेत आमचं संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद आमचाच आहे. नियमानुसार तेच असते, असे म्हणतं शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी अशोक चव्हाण यांना प्रत्यूत्तर दिले.

Mahavikas Aghadi
सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजनांचे मंत्रीपद हुकणारच होते... पण कष्टाने वाचवले...

सध्य स्थितीमध्ये विधान परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी १० सदस्य आहेत. तर शिवसेनेचे १२ सदस्य आहेत. त्यात उपसभापतीपदी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे विराजमान आहेत. शिवसेनेचे आमदार उद्धव ठाकरे यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेची दावेदारी भक्कम मानली गेली. त्यातूनच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com