शिवसैनिकांकडून बनावट स्टॅम्पचा वापर, गुन्हा दाखल : ठाकरेंच्या अडचणी वाढणार?

Shivsena : खोट्या बनावट ओळखपत्रांचा वापर झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुंबईमध्ये बनावट प्रतिज्ञापत्रांचा घोटाळा उघडकीस आला आहे. शिवसेनेने आपल्या काही सदस्याकडून घेण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रावरून नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सुपूर्द केलेल्या प्रतिज्ञापत्रात बनावट स्टॅम्पचा वापरल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात आता वांद्रेच्या निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे ठाकरे यांच्यापुढील अडचणी वाढणार असल्याची चर्चा आहे.

मुंबईमध्ये तब्बल 4 हजार 682 खोटी प्रतिज्ञापत्र बनवल्याची धक्कादायक माहिती आता उघडकीस आली आहे. पोलिसांकडून आता ही सर्व बनावट प्रतिज्ञापत्र ताब्यात घेण्यात आले आहेत. ठाकरे गटाकडून बनावट प्रतिज्ञापत्र सादर केल्या गेल्याचा आरोप शिंदे गटाचे ठाण्याचे नेते नरेश म्हस्के यांनी केले आहेत.

Uddhav Thackeray
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता किती दिवस टिकेल?

मुंबईच्या क्राईम ब्रांचकडून मुंबईत मोठी धडक कारवाई करण्यात आली. वांद्रे, माहिम या भागात हे धाड सत्र सुरू होते. या कारवाईत पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात खोटी व बनावट कागदपत्रं ताब्यात घेण्यात आली आहेत. शिवसेनेतील एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली गेली. शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट विलग झाले आहेत.

आम्हीच खरी शिवसेना, असा दावा आता एकनाथ शिंदे यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे. शिवसैनिकांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवण्यासाठी जी कागदपत्रे सादर केली, त्या प्रतिज्ञापत्रावर बनावट रबर स्टॅम्पचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार तपासादरम्यान समोर आले आहे. यासाठी खोट्या बनावट ओळखपत्रांचा वापर झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com