Uttar Bharatiya Ekta Manch : ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा आणखी एक झटका; 25 वर्षांपासून बरोबर असलेल्या उत्तर भारतीय एकता मंचने साथ सोडली

Uttar Bharatiya Ekta Manch Merges with Eknath Shinde Shiv Sena : उत्तर भारतीय एकता मंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात विलीन झाल्याची घोषणा मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रेम विश्वकर्मा यांनी केली.
Uttar Bharatiya Ekta Manch
Uttar Bharatiya Ekta ManchSarkarnama
Published on
Updated on

Uttar Bharatiya community Maharashtra : मुंबईसह आजूबाजूच्या महापालिकेत प्रभावी ठरणाऱ्या उत्तर भारतीयांचे मतदान खेचण्यासाठी महायुतीमध्ये स्पर्धा सुरू आहे. महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने यात कुरघोडी केल्याचे दिसत आहे.

उत्तर भारतीय एकता मंचचे प्रमुख पदाधिकारी आणि 600 कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात विलीन झाले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाबरोबर गेल्या 25 वर्षांपासून असलेल्या उत्तर भारतीय एकता मंच होता. परंतु मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंनी हा शिवसेना ठाकरे सेना पक्षाला मोठा झटका दिल्याचे बोलले जात आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय एकता मंच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेना पक्षात विलीन झाला आहे. याबाबतची घोषणा मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रेम विश्वकर्मा यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली. मुंबई महापालिकेत उत्तर भारतीयांचे मतदान खूप निर्णायक ठरते. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत उत्तर भारतीय एकता मंच विलीन झाल्याने बूस्टर डोस मिळाल्याची चर्चा आहे.

मुंबई (Mumbai) महापालिकेच्या निवडणुकीत उत्तर भारतीयांचे जवळपास 40 लाख मतदार आहे. या समाजावर भाषावादाच्या नावाखाली होणारे हल्ले तत्काळ थांबले पाहिजेत. आगामी महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीय समाजातील उमेदवाराला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून संधी मिळणार असून, संपूर्ण समाज त्यांच्या उमेदवारांच्या पाठीशी उभा राहील, असे प्रेम विश्वकर्मा यांनी सांगितले.

Uttar Bharatiya Ekta Manch
Raigad Crime : दादांच्या राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष शिकारी? घरात सापडले संरक्षित वन्य प्राण्याचे मांस, वनविभागाची झाडाझडती अन् पोलिसांची कारवाई

10 नोव्हेंबरला मुंबईत उत्तर भारतीय एकता मंचच्या वतीने ‘स्वाभिमान यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेत मोठ्या संख्येने उत्तर भारतीय समाज सहभागी होणार असल्याचे विश्वकर्मा यांनी म्हटले. गेल्या 25 वर्षांपासून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षासोबत काम करत होतो; मात्र त्यांची मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत युती होण्याची शक्यता असल्याने आम्ही त्यांची साथ सोडल्याचेही प्रेम विश्वकर्मा यांनी सांगितले.

Uttar Bharatiya Ekta Manch
TOP 10 News : डॉक्टर तरुणी प्रकरणाला धक्कादायक वळण, माजी मुख्यमंत्र्यांसोबत काम केलेल्या बड्या नेत्याचा रामराम, अख्खा पक्षच भाजपच्या गळाला

एकनाथ शिंदे म्हणाले, "खरी शिवसेना बाळ ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारसरणीचे पालन करते. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात झालेल्या विकासकामांनी प्रभावित होऊन एकता मंचचे पदाधिकारी शिवसेनेत सामील झाले आहेत. आता आपण सर्वजण एका कुटुंबासारखे राहू आणि एकमेकांना आधार देऊ."

विकास आणि एकता, लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उत्तर भारतीय एकता मंचचे अध्यक्ष प्रेम विश्वकर्मा यांनी सांगितले. उपाध्यक्ष सुनील गुप्ता आणि उपदेश जयस्वाल यांनी या निर्णयामुळे उत्तर भारतीय मंचचे राज्य सरकारबरोबर चांगले संबंध प्रस्थापित होण्यास मदत होईल, असे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com