मुलाच्या कोठडीमुळे नारायण राणे वैफल्यग्रस्त: वैभव नाईकांचा पलटवार

Narayan Rane| Vaibhav Naik| Shivsena| नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर केलेल्या आरोपांना वैभव नाईकांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
Vaibhav Naik- Narayan Rane
Vaibhav Naik- Narayan Rane sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : 'केंद्रीयमंत्री झाल्यापासून गेल्या वर्षभरात नारायण राणेंनी (Narayan Rane) अनेकदा शिवसेनेला संपवण्याच्या वलग्ना केल्या. पण ते शिवसेनेचे काहीही वाकडं करू शकले नाहीत. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेले असून ते शिवसेनेवर आरोप करत आहेत,' अशा शब्दांत शिवसेनेचे नेते वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी नारायण राणे यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. (Shivsena- Narayan Rane dispute latest news update)

दोन दिवसांपूर्वी शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. नारायण राणे- ठाकरे वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहेत. अशातच आज पुन्हा एकदा नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. या हल्ल्याला शिवसेना नेते वैभव नाईक यांनी नारायण राणेंना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

Vaibhav Naik- Narayan Rane
निवडणुकीच्या मुहूर्तावर तुरुंगातून बाहेर आलेल्या बाबा राम रहीमने 24 तास आधी खोलले पत्ते

दरम्यान, राणेंच्या जुहूमधील बंगल्याला मुंबई महापालिकेकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. यावरुनही नारायण राणेंनी राज्य सरकारवर टीका केली. या टीकेला उत्तर देताना वैभव नाईक म्हणाले की, नारायण राणेंचा बंगला योग्य पध्दतीने असेल तर कारवाई होणार नाही. सध्या बीएमसीची कायदेशीर प्रक्रिया चालू आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंना अटक होऊन पोलीस कोठडी झाली तेव्हापासून राणे वैफल्यग्रस्त झालेत, अशा शब्दांत त्यांनी नारायण राणेंवर पटलावर केला आहे.

नितेश राणे हे कलाकार आहेत की आरोपी आहेत हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. राणेंनी दिशा सालियन मर्डरबद्दल अनेक दाखले दिले त्यांना मर्डरबद्दल जास्तच माहिती आहे. माझी सरकारला विनंती आहे, मर्डरची आणखी अनेक प्रकरणे उघडता येतील. अंकुश राणे, मंचेकर, गोवेकर ही सर्व प्रकरणे सरकारने उघडली पाहिजेत. त्यांच्या मागे कोण आहे हे बघितलं पाहिजे अशी माझी राज्य सरकारकडे मागणी आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.

Vaibhav Naik- Narayan Rane
निवडणुकीच्या मुहूर्तावर तुरुंगातून बाहेर आलेल्या बाबा राम रहीमने 24 तास आधी खोलले पत्ते

सुशांतसिंग प्रकरणात सीबीआयने राणेंना बोलवून घ्यायला हवं, जर त्यांच्याकडे पुरावे असतील ते घेऊन सीबीआयने कारवाई करावी. राणे दिल्लीत असतात त्यांनी सीबीआय कार्यालयात जाऊन नावं द्यावीत. राणेंकडे जर कोणाचे कारनामे असतील तर त्यांनी बाहेर काढावेत, फुकटच्या वलग्ना करू नयेत. फुकाच्या धमक्या देऊ नयेत. काल राणेंनी सांगितलं, ईडीची नोटीस येणार आहे आज नोटीस कुठे गेली? आज दुसराच विषय त्यांनी घेतला. लोकांमध्ये चर्चेत येण्यासाठी राणे काहीतरी आरोप करत असल्याचेही यावेळी नाईकांनी नमुद केलं.

शिवसेना हा मराठी माणसांसाठीच पक्ष आहे. पण आज राणे कोणाची चापलुसी करत आहेत? भाजप नेते किरीट सोमय्या सारख्या मराठीद्वेष्ठ्याची ते बाजू घेत आहेत. आमदार मंगलप्रभात लोढांसारख्या मुंबईतल्या अमराठी माणसाची राणे बाजू घेत आहेत. त्यामुळे राणेंना मराठी माणसाबद्दल बोलण्याचा अधिकार राहिला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, राणेंच्या आरोंपाकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना लक्ष देण्याची गरज नाही. अशा आरोपांकडे शिवसेना ही लक्ष देणार नाही, असेही नाईकांनी स्पष्ट केल आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com