युवासेनेचे नेते सरदेसाईंनी केलं सर्वच पक्षाच्या युवा संघटनांना आवाहन

''ड्रग्स व बेरोजगारी रोखण्यासाठी सर्वच पक्षांच्या संघटनांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे युवा सेना नेते वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी सांगितले.
Varun Sardesai
Varun Sardesaisarkarnama
Published on
Updated on

डोंबिवली : मुंबईत क्रूजवर सुरू असलेल्या ड्रग पार्टीचे कुणकुण लागताच यांची एनसीबीने छापा टाकला. या कारवाईत अभिनेता शाहरुख खान यांच्या मुलासह काही जणांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली. तर गेल्या काही महिन्यांपासून अनेक तरुण नशेच्या आहारी गेल्याचे समोर आलं आहे. ''ड्रग्स व बेरोजगारी रोखण्यासाठी सर्वच पक्षांच्या संघटनांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे युवा सेना नेते वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी सांगितले. ते आज युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर बोलत होते.

वरुण सरदेसाई म्हणाले की, ड्रग्स प्रकरणी तपास यंत्रणा आपले अधिकृत स्टेटमेंट देतीलच , मात्र संपूर्ण तरुणाईनं यातून बोध घेतला पाहिजे. आज फक्त तरुणाई समोर ड्रग्स हा एकच विषय नसून वाढती बेरोजगारी हा देखील तरुणांसमोर खूप मोठा प्रश्न आहे. तरुणांना ड्रग्सच्या आहारी जाण्यापासून रोखण्यासाठी, त्यांच्या रोजगारासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचं आहे. याकरिता फक्त युवासेना नव्हे तर सर्वच पक्षाच्या युवा संघटनांनी एकत्र येऊन या दोन्ही प्रश्नांवर गांभीर्याने मोहीम राबवली पाहिजे.

Varun Sardesai
मुख्यमंत्री बघेल, रंधावा यांना विमानतळावरच अडविणार

''माझा जन्म डोंबिवलीचा असल्याने मी डोंबिवलीत येत असतो आणि यापुढेही येणार,'' असे वरुण सरदेसाई यांनी सांगितले. डोंबिवलीच्या शिवसेना शाखेत युवासेनेच्या मुलाखतीसाठी तरुणांनी गर्दी केली होती. युवानेते वरुण सरदेसाई, दीपेश म्हात्रे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि निखिल वाळेकर यांनी मुलाखती घेतल्या.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या हिंसक चकमकीत शेतकऱ्यांच्या मृत्यूवरून केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) यांच्यासह 14 जणांविरोधात खून, गुन्हेगारी कट आणि दंगल यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात लखीमपूरच्या टिकुनिया पोलिस ठाण्यामध्ये खून, गुन्हेगारी कट, अपघात आणि दंगलीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगजीत सिंह यांच्या तक्रारीवरून लखीमपूरच्या टिकुनिया पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com