Vasai-Virar Politics : बविआला भाजपचा पुन्हा धक्का, माजी नगरसेवकांनी घेतले कमळ हाती!

BVA Vs BJP : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बविआला गळती लागली असून माजी नगरसेवकासह, बविआच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Former BVA corporators and leaders join BJP in Mumbai in presence of MLA Sneha Dubey Pandit and BJP state president Ravindra Chavan.
Former BVA corporators and leaders join BJP in Mumbai in presence of MLA Sneha Dubey Pandit and BJP state president Ravindra Chavan. sarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील दोन-तीन महिन्यांपासून बहुजन विकास आघाडीला (बविआ) गळती लागली आहे. महापालिकेवर मोर्चा काढून बविआने शक्तिप्रदर्शन केले होते. मात्र, तरी देखील बविआमधून आऊट गोईंग थांबायचे नाव घेत नाही.

वसईच्या भाजप आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वाखाली बविआतील माजी नगरसेवकांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. वसई-विरार महापालिकेत हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व होते. मात्र, विधानसभा आणि लोकसभेतील बविआच्या पराभवानंतर अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये बविआघाडीचे माजी नगरसेवक प्रदीपभाई नरसिंग पवार, बविआचे नगरप्रमुख नंद किशोर नरसिंग पवार, बविआ संघटक ॲड. नैशाद सुभोधचंद्र पारिख, राजेंद्र चाफेकर,अमोल पाटील, कैलास रांगणेकर,सुधीर चौधरी, संतोष मिश्रा, प्रकाश विठ्ठल जाधव, महेश पाटील यांचा समावेश आहे. तसेच धर्म जागरण नगर संयोजक रविंद्र बाबूराव चव्हाण, सिध्देश राणे यांच्यासह विविध मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Former BVA corporators and leaders join BJP in Mumbai in presence of MLA Sneha Dubey Pandit and BJP state president Ravindra Chavan.
Vidarbha politics : विदर्भात हालचाली वाढल्या : अजितदादांनंतर एकनाथ शिंदेही ॲक्टिव्ह; सर्व पदाधिकाऱ्यांना तातडीने मुंबईला बोलावलं

बविआ विरुद्ध भाजप सामना

आगामी वसई-विरार महापालिका निवडणुकीत बविआ विरुद्ध भाजप असा सामना होणार आहे. भाजपने बविआला गळती लावली असून बविआकडून डॅमेज कंट्रोल करण्यात येत आहे.विधानसभा आणि लोकसभेतील पराभवामुळे आगामी महापालिका निवडणुकी ही हितेंद्र ठाकूर यांच्या अस्तित्वाची लढाई असणार आहे.

Former BVA corporators and leaders join BJP in Mumbai in presence of MLA Sneha Dubey Pandit and BJP state president Ravindra Chavan.
RSS update : शाळा-कॉलेजमध्ये RSS च्या कार्यक्रमांवर बंदी? काय आहे काँग्रेस सरकारचा प्लॅन?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com