Badlapur News : बदलापुरातील पीडित मुलींवर 15 दिवसांत अनेकदा अत्याचार, समितीच्या अहवालात संतापजनक माहिती

Badlapur Rape Case : समितीच्या अहवालानुसार पीडित अल्पवयीन मुलीच्या प्रायव्हेट पार्टला जवळपास एक इंच इजा झाल्याचं म्हटलं आहे. तर जवळपास 15 दिवसांत तिच्यावर अनेक अनेक वेळा लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता वर्तवली आहे.
Badlapur Rape Case
Badlapur Rape Casesarkarnama
Published on
Updated on

Badlapur Rape Case : बदलापुरात दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. पोलिसांचा हलगर्जीपणा आणि शाळा प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

त्याचे पडसाद देखील बदलापूर स्थानकापासून राज्यभरात उमटल्याचं पाहायाला मिळत आहे. या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात विरोधकांकडून निदर्शन करण्यात येत आहेत. तर या प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) देखील सरकार आणि पोलिसांना फटकारलं आहे.

हे सर्व सुरू असतानाच बदलापूर (Badlapur) अत्याचाराच्या घटनेची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या दोन सदस्यीय समितीने सरकारला प्राथमिक चौकशी अहवाल सादर केल्याची माहिती आहे. या अहवालातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. समितीच्या प्राथमिक अहवालानुसार या घटनेतील मुलींवर 15 दिवसांपासून अत्याचार सुरु होते, अशी संतापजनक माहिती समोर आली आहे.

Badlapur Rape Case
Devendra Fadnavis Vs Anil Deshmukh : देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात अनिल देशमुखांसाठी चाचपणी?

समितीच्या अहवालानुसार पीडित अल्पवयीन मुलीच्या प्रायव्हेट पार्टला जवळपास एक इंच इजा झाल्याचं म्हटलं आहे. तर जवळपास 15 दिवसांत तिच्यावर अनेक अनेक वेळा लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता वर्तवली आहे.

कोणतीही पार्श्वभूमी न तपासता आरोपीची भरती

तर या शाळेत 1 ऑगस्ट रोजी कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झालेला आरोपी अक्षय शिंदेची कोणतीही पार्श्वभूमी न तपासता त्याला भरती केले होते. तसेच त्याला शाळेच्या आवारात ओळखपत्राशिवाय त्याला सहज प्रवेश दिला जात होता. त्याची नियुक्ती आउटसोर्स संस्थेद्वारे करण्यात आली की कोणाच्या शिफारसी करण्यात आली याची माहिती मिळवणं गरजेचं आहे.

Badlapur Rape Case
Badlapur School Crime Case : बदलापूर घटनेनंतर राज्य सरकारने उचलली कठोर पावले; मुंबई अन् ठाण्याचे शिक्षणाधिकारी निलंबित

प्रश्नांचा संच

तर हे प्रकरण हाताळण्यात अपयशी ठरल्याबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी बाल हक्क आयोगाने शाळा प्रशासनाला प्रश्नांचा संच पाठवला असून येत्या सात दिवसांत उत्तरे मागवली जाणार आहेत. शिवाय या प्रकरणी शाळा (School) प्रशासनावर POCSO कायदा का लावला जाऊ नये? असे प्रश्न या समितीने विचारले आहेत.

- शाळा प्रशासन तब्बल 48 तास तक्रारीवर शांत बसल्याचे दिसून आले.

- तक्रारीनंतरही शाळा प्रशासनाने पालकांची भेट घेतली नाही.

- पीडित चिमुकलीवर उपचार करण्यासाठी रुग्णालयाला 12 तास लागले.

- स्वच्छतागृह कर्मचारी कक्षापासून दूर आणि निर्जन ठिकाणी आहे.

- सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसवलेले नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com