Badlapur School Crime Case : बदलापूर घटनेनंतर राज्य सरकारने उचलली कठोर पावले; मुंबई अन् ठाण्याचे शिक्षणाधिकारी निलंबित

Crime Case News : बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर राज्य सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे आणि मुंबईच्या शिक्षणाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली.
Badlapur Rape Case Police
Badlapur Rape Case Policesarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बदलापूरच्या शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेनंतर पालक व नागरिकांनी मोठे आंदोलन केले होते. या सर्व प्रकरणाची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. बदलापूर येथील या घटनेचे तीव्र पडसाद समाजात उमटलेले असताना राज्य सरकारनेही आता या प्रकरणी कठोर पावले उचलली आहेत.

विरोधकांनी या प्रकरणात राज्य सरकारला टार्गेट करीत शनिवारी महाराष्ट्र बंदचे आयोजन केले होते. त्यांनतर मुंबई उच्च न्यायालयाने राजकीय पक्षांना बंदची हाक देता येत नसल्याचे सांगत बंदच्या निर्णयावर ताशेरे ओढले होते. त्यानंतर, महाविकास आघाडीतील (MVA) हा महाराष्ट्र बंद मागे घेतला आहे. (Badlapur School Crime Case)

या सर्व घटनाक्रमानंतर राज्य सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ठाणे आणि मुंबईच्या शिक्षणाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केली. तर गृह विभागाच्यावतीने येथील पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. या प्रकरणातील तपासाच्या दृष्टीने राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत.

बदलापूर येथील घटनेचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. या प्रकरणी विरोधकांकडून राज्यभर आंदोलने केली जात आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाविकास आघाडीने बंद मागे घेतला असला तरी महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष शनिवारी काळ्या फिती बांधून आंदोलन करणार आहेत. त्यातच शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे उद्या बदलापूरला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक झाल्याचे पाहवयास मिळत आहे.

Badlapur Rape Case Police
Bjp News : नड्डांचा दौरा अचानक रद्द; फडणवीस गाठणार गोवा; मंत्रिमंडळ फेरबदल...

बदलापूर येथील या घटनेनंतर राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. महापालिकेअंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये सीसीटीव्ही प्रकल्प अंमलबजावणी न केल्याचा ठपका ठेवत मुंबई महानगरपालिकचे शिक्षण अधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ यांना निलंबित करण्यात आले. त्याशिवाय निष्काळजीपणाचा ठपका ठेवत ठाणे महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांच देखील निलंबित करण्यात आले आहे.

बदलापूरमधील घटनेनंतर गृह खात्यांनी कारवाई केली असून बदलापूरच्या पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांचे निलंबन करुन त्यांची मुंबईला बदली करण्यात आली आहे. 20 ऑगस्टला त्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले होते. मात्र, असे असताना 23 ऑगस्टला शुभदा शितोळे यांच्या बदलीचा आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे शुभदा शितोळे यांच्यावर कारवाई नक्की करण्यात आली यावरून संभ्रम दिसत आहे.

बदलापूर प्रकरणात विशेष तपास पथकाने शाळेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. त्यामुळे बदलापूर येथील शाळा व्यवस्थापनाविरुद्धही POCSO च्या कलम 21 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. POCSO कायद्याच्या कलम 19 च्या तरतुदींचे पालन केले नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. राज्य सरकारकडून या प्रकरणात कारवाई केली जात आहे.

Badlapur Rape Case Police
Eknath Shinde : लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे कितव्या स्थानी? अवघ्या 3 टक्के लोकांनी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com