मला साहेबांच्या अंत्यसंस्काराला जाऊ द्या म्हणत मेटेंच्या ड्रायव्हरने फोडला होता टाहो

शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्यावर आज बीडमद्ये (Beed) अंत्यसंस्कार करण्यात आले.
Vinayak Mete, Eknath Kadam
Vinayak Mete, Eknath Kadamsarkarnama

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्यावर आज बीडमद्ये (Beed) अंत्यसंस्कार करण्यात आले. मेटे यांना शेवटचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर उसळला होता. यावेळी अनेकांना अश्रू आवराता आले नाही. मात्र, पनवेलमध्ये एमजीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मेटे यांच्या गाडीचे चालक एकनाथ कदम यांनी 'मला इथे का ठेवले आहे. मला काही होत नाही.... मला साहेबांचे शेवटचे दर्शन घेऊ द्या, मला त्यांच्या अंत्यसंस्काराला जाऊ द्या', असा टाहो फोडला.

यावेळी कदम यांना आवरणे पोलिसांनाही शक्य होत नव्हते. साहेबांचे शेवटे दर्शन घेऊ द्या म्हणून ते धाय मोकलून रडत होते. कदम यांच्या चौकशीसाठी पोलिस दाखल झाले आहेत. यावेळी पोलिसांकडे अंत्यसंस्काराला जाऊ द्या, अशी आर्त विनवणी कदम यांनी केली.

Vinayak Mete, Eknath Kadam
ITMS : मेटेंच्या अपघाती मृत्यूनंतर सरकारने घेतला 'हा' निर्णय, अपघातांना लागणार 'ब्रेक'

मराठा आरक्षणासाठी शेवटपर्यंत लढणारे नेते विनायक मेटे यांचे रविवारी सकाळी अपघातात निधन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा क्रांती मोर्चाची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला हजेरी लावण्याकसाठी मेटे बीडहून मुंबईकडे येत होते. बीडमधला कार्यक्रम सोडून मेटे मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. पण वाटेत त्यांना काळाने गाठले.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर त्यांचा अपघात झाला. त्यांचे वाहनचालक एकनाथ कदम आणि बॉडीगार्ड राम ढोबळे जखमी झाले. वाहन चालक एकनाथ कदम यांच्यावर पनवेलमधील रुग्णालयात तर राम ढोबळे यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक इथे उपचार सुरु आहेत. कदम यांनी विनायक मेटे यांच्या वाहनाचे गेली अनेक वर्ष सारथ्य केले. मेटे यांचा एकनाथ कदम यांच्यावर फार जीव होता. दौऱ्यावर असताना स्वत:च्या जेवणाआधी ते कदम यांच्या जेवणाची विचारपूस करत असत.

Vinayak Mete, Eknath Kadam
विनायक मेटे अनंतात विलीन; अखेरचा निरोप देतांना कार्यकर्त्यांना भावना अनावर

असंख्य दौऱ्यात मेटे यांच्यासोहत कदम होते. रविवारीही मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकीला बीडमधील कार्यक्रम आटपून मेटेंसोबत यायला कदम मध्यरात्री निघाले. मात्र, रसायणीजवळ समोरच्या ट्रकने लेन बदलल्याने मेटे यांच्या गाडीने ट्रकला धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये इन्डेव्हेर गाडीच्या समोरच्या भागाचा पूर्ण चक्काचूर झाला. या अपघातात चालक कदम आणि बॉडीगार्ड ढोबळे जखमी झाले. तर मेटे यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांची प्राणज्योत मालवली. दुसरीकडे कदम यांना डिस्चार्ज मिळण्याची पोलीस वाट पाहत आहेत. कदम आणि धडक दिलेल्या ट्रक ड्रायव्हरची पोलीस एकत्रित चौकशी करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com