Ram Mandir Inauguration : राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा सोहळा निमंत्रणाची VVIP यादी तयार; राज अन् उद्धव ठाकरेंना निमंत्रण?

Raj Thackeray and Uddhav Thackeray : राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणाच्या कार्यक्रमाची निमंत्रणाच्या यादीवरुन राजकारण...
Ram Mandir
Ram MandirSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : अयोध्येमध्ये राम मंदिर रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाची तयारी सुरु आहे. मंदिर निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. तर या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरुन राजकारणही तापत आहे. या सोहळ्यासाठी जवळपास 350 पेक्षा जास्त व्हिव्हिआयपींना निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Ram Mandir
NCP Ajit Pawar Group : राष्ट्रवादीचा अजित पवार गट टाकणार 'टाॅप गिअर' ; जिल्हाध्यक्षांना मिळणार 'हे' मोठं गिफ्ट

अयोध्येत २२ जानेवारीला श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापणाच्या कार्यक्रमाला मुंबईतल्या व्हीव्हीआयपींच्या एक यादी बनवली गेली आहे. या यादीत संत-महंत, राजकीय पक्षांचे अध्यक्ष, स्टार खेळाडू, बॉलिवूड स्टार, मोठे उद्योगपती, स्टार सेलिब्रेटीज यांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. उद्यापर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण मिळणार असल्याची शक्यता आहे.

Ram Mandir
Sanjay Raut On BJP: 'अयोध्येतील सोहळ्याचं निमंत्रण देणारं भाजप कोण ?'; संजय राऊतांनी सुनावलं

आज - उद्या निमंत्रण मिळणार :

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठापणा निमंत्रण पाठवण्यासाठी, निमंत्रितांसाठीची जबाबदाऱ्या प्रचारकांना वाटून देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना सुद्धा या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवण्यात येणार आहे. आज किंवा उद्य़ा या दोन्ही नेत्यांना अधिकृतपणे निमंत्रण पाठवण्यात येणार असल्याचे सूत्रांची माहिती आहे.

Ram Mandir
NCP Rupali Patil : भाजप- शिंदे गट अजितदादांवर नाराज; राष्ट्रवादीच्या रूपाली पाटलांचा 'हा' सल्ला

नाराजी नाट्य सुरु ?

ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना निमंत्रण न मिळाल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या होत्या. ज्याप्रमाणे भाजपचे ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण आडवाणींना ज्याप्रमाणे निमंत्रण मिळाले नाही, त्यानुसारच उद्धव ठाकरेंना निमंत्रण मिळाले नसल्याची टीका राऊतांनी भाजपवर केली होती. खरंतर राम मंदिराच्या निर्माणात भाजपचं काहीच योगदान नाही. आम्ही बाबरी पाडली तेव्हा, भाजपवाले बिळात जाऊन लपले होते, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com