NCP Rupali Patil : भाजप- शिंदे गट अजितदादांवर नाराज; राष्ट्रवादीच्या रूपाली पाटलांचा 'हा' सल्ला

Pune District Planning Committee Fund Allocation : रुपाली पाटील यांचा सल्ला
Rupali Thombare Patil
Rupali Thombare PatilSarkarnama

Pune Political News: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांना घेऊन बाहेर पडले. त्यानंतर राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा जाहीर करत अजित पवार सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्री झाले.

त्यानंतर पुण्याचे पालकमंत्री पद देखील अजित पवारांनी आपल्या ताब्यात घेत विकासाची कामे करण्यास सुरुवात केली. मात्र, आता सत्तेत सहभागी असलेल्या शिंदे-फडणवीस गटाच्या सदस्यांनी अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटले आहे.

पालकमंत्री अजित पवार यांनी निधी वाटपात अन्याय केल्याची भावना जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे. या अन्यायाच्या विरोधात थेट कोर्टात जाण्याचा इशारा सदस्यांनी दिल्याने पुढील काळात हा संघर्ष अधिक पेटण्याची शक्यता आहे.

जिल्हा नियोजन समितीमध्ये विकासकामांसाठी आलेल्या पत्रांवर थेट निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याचा आरोप समितीच्या सदस्यांनी केला आहे. हे सदस्य भाजप आणि शिंदे गटातील आहेत. समितीच्या बैठकीत निधी देण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नसताना परस्पर हा निधी देण्यात आल्याचे या सदस्यांचे म्हणणे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rupali Thombare Patil
Amol Kolhe News : कोल्हेंच्या निशाण्यावर पुन्हा अजितदादा; म्हणाले," तुम्ही मोठे आहात तर..."

याबाबत नाराज सदस्यांनी एक निवेदन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना दिले आहे. 800 कोटींच्या कामाचे इतिवृत्त भाजप आणि शिंदे गटातल्या सदस्यांना देण्यात आले नव्हते, असा आक्षेप सदस्यांनी घेतला आहे. यासर्व प्रकारामुळे सत्तेतल्या तिन्ही पक्षातील धुसफूस आता समोर येण्यास सुरुवात झाली आहे.

यापूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन समितीचे इतिवृत्त समितीच्या सदस्यांना देण्यात आलेले नाही. विकास कामे करण्याची पत्रे दिल्यानंतर त्याला मंजुरी देत हा निधी कसा देण्यात आला, असा प्रश्नही सदस्यांनी उपस्थित केला आहे.

यासर्व प्रकारावर राष्ट्रवादीच्या शहरातील पदाधिकारी रुपाली पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, अजितदादा विरोधकांना देखील निधी देतात. मग सत्तेत सहभागी असलेल्या शिंदे, भाजपच्या सदस्यांना निधी देण्यास ते विरोध का करतील?

सदस्यांची भावना निधी न मिळाल्याची असेल तर त्यांनी पालकमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन बाजू मांडायची होती. थेट कोर्टात जाणे योग्य नाही. अजूनही या सदस्यांनी पवार यांच्याकडे जाऊन भूमिका मांडावी, विनाकारण वाद घालत बसू नये, असा सल्लाही रुपाली पाटील यांनी दिला आहे.

Rupali Thombare Patil
Pimpri Political News : 'टीडीआर' घोटाळ्यात भाजपच्या आमदार जगताप यांची उडी..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com