Wada Nagar Panchayat Result : भाजप सुसाट, ठाकरेंच्या उमेदवाराचा एका मताने पराभव; पहिल्या फेरीत सहा जण विजयी

nagar Panchayat Election Result 2025 : वाडा नगरपंचायतीमध्ये भाजपने मोठे यश मिळवले आहे. पहिल्या फेरीत भाजपचे सहा नगरसेवक विजयी झाले आहेत.
BJP
BJP Sarkarnama
Published on
Updated on

दिलीप पाटील

Wada News : पालघर जिल्ह्यातील वाडा नगरपंचयातीचा पहिला फेरीचा निकाल समोर आला आहे. या निकालामध्ये भाजपचे सहा नगरसेवक विजय झाले आहेत.प्रभाग क्रमांक 6 मधून भाजपच्या सिद्धी भोपतराव या एका मताने विजयी झाल्या आहे. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमदेवार प्रिया गंधे यांचा अवघ्या एका मताने पराभव केला आहे.

भाजपचे उमेदवार रविंद्र कामडी, अशिकेश सतीश पवार, श्वेता उंबरसडा, प्रिया गंधे तसेच मयुरी म्हात्रे,सविता वनगा विजय झाले आहेत. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमदेवार रिमा गंधे या देखील आघाडीवर आहेत.

दुसऱ्या फेरीत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रिमा गंधे यांनी 975 मतांची आघाडी घेतली आहे. तर, प्रभाग नऊमधून शिंदेंच्या शिवसेनेचे शमीम शेख विजयी झाले आहेत. तर, प्रभाग 10 मधून भाजपच्या मनिष देहेरकर विजयी झाले आहेत. तर, प्रभाग आठमधून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदश लोंखंडे विजयी झाले आहेत.

BJP
Suhas Kande Politics: नांदगावला आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांना मागे टाकले, पहिल्याच फेरीत शिवसेनेच्या उमेदवाराला मोठी आघाडी!

काँग्रेसने खाते उघडले

काँग्रेसच्या भारती सपाटे यांनी प्रभाग 12 मधून विजयी झाले आहेत. दुसऱ्या फेरीपर्यंत भाजपने तब्बल 10 जागा आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दोन जागांवर विजय मिळवला आहे.

BJP
Bhugur Election Result : भगूरमध्ये शिवसेनेच्या करंजकरांची २५ वर्षांची सत्ता उलथवली, राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे विजयी..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com