Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचा विस्तार अधांतरीच; इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Maharashtra Cabinet Expansion News : मंत्रिमंडळ विस्ताराचं भवितव्य न्यायलयाच्या सुनावणीवर?
Shinde-Fadnavis Government
Shinde-Fadnavis Government Sarkarnama

Maharashtra Cabinet Expansion News : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनाच्या आधी होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता दिसच नाही. कारण शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेसंबंधी न्यायालयात सुरु असलेल्या याचिकांच्या निर्णयापर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता नाही, असं अनेकांचे म्हणणे आहे.

त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सध्या तरी अधांतरीच असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे इच्छुकांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आल्याचं पाहायला मिळत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनापूर्वी करण्याबाबत अधिवेशनात उत्तरे देण्यासाठी राज्यमंत्र्यांनी आवश्यकता असल्याचे सांगून मंत्रिमंडळ विस्तार होण्याबाबतचे संकेत दिले होते. तर सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह २० मंत्री आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वाधिक खाती आहेत.

Shinde-Fadnavis Government
Lok Sabha Speaker Om Birla : असं न कराल तर चांगलं राहील; लोकसभा सभापतींचा खासदारांना इशारा

राज्य मंत्रिमंडळात नऊ मंत्री शिंदे गटाचे तर नऊ मंत्री भाजपाचे आहेत. पण शिंदे गटातील नऊ जणांना अपेक्षेप्रमाणे खाती मिळाली नसल्याने त्यांच्यात मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार हे मंत्रीपद मिळण्यासाठी जोरदार लॉबिंग करत आहेत.

मात्र शिंदे सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिले दोन महिने एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोघेजण कॅबिनेटचे निर्णय घेत होते. त्यानंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यामध्ये अनेकांची वर्णी लागली नाही. त्यांना दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्याचे आश्वासन देण्यात आले. पण अद्यापही विस्ताराबाबत कोणतीच हालचाल नसल्याने भाजपसहित (BJP) शिंदे गटातील अनेक जण नाराज असल्याचं बोललं जात आहे.

Shinde-Fadnavis Government
Prakash Ambedkar : जातीव्यवस्थेतील पुजारीपणाला आंबेडकरांचे आव्हान; म्हणाले...

मंत्रिमंडळ विस्ताराचं भवितव्य न्यायलयाच्या सुनावणीवर?

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. तर या याचिकांवर नवीन वर्षात १३ जानेवारीला सुनावणी होणार आहे. या सुनावणीत होणाऱ्या निर्णयावरच सरकारचे भवितव्य असल्याने मंत्रीमंडळ विस्तार पुढे ढकलला जात असल्याचे सांगितले जात आहे. (Maharashtra Cabinet Expansion News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com