Solapur News : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने (बीआरएसने) सोलापुरात पक्षबांधणीसाठी कंबर कसली आहे. सोलापूरमध्ये बीआरएसने थेट भाजपलाच मोठा धक्का दिला आहे. भाजप अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले असून, ते आता बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपलाच बीआरएसने जोरदार दणका दिल्यामुळे याची सोलापूरात चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी के चंद्रशेखर राव यांनी सोलापूरचा जिल्ह्याचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी पंढरपूरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. शेकडो गाड्यांचा ताफा पंढरपुरात दाखल झाल्याने त्यांचा हा दौरा चांगलाच चर्चेत विषय ठरला होता. आता त्यांनी सोलापुरात भाजपला मोठा धक्का दिला आहे.
भाजपा अल्पसंख्याक आघाडीच्या 25 पदाधिकाऱ्यांनी आपल्या सदस्यत्वाचा सामूहिक राजीनामा दिला आहे. आता हे सर्व पदाधिकारी आज सकाळी 11 वाजता बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत. हे पदाधिकारी काल रात्रीच हैदराबादला रवाना झाले असून, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.आगामी विधानसभा-लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.