राऊतांना मलिकांच्या शेजारी राहायला जावं लागणार, जाब द्यावाचं लागणार: सोमय्या

संजय राऊत यांची लूटमार, माफियागिरीचे मी पुरावे दिले होते.
Sanjay Raut,  Kirit sommiya
Sanjay Raut, Kirit sommiyasarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ईडीचे अधिकारी तीन तासापासून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची चौकशी करीत आहेत. या कारवाईनंतर भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या (kirit sommaiya) यांनी राऊतांवर (sanjay raut) निशाणा साधला आहे. ते माध्यमांशी बोलत आहेत. (kirit sommaiya news update)

सोमय्या म्हणाले, "संजय राऊतांविरोधात मी पुरावे दिले आहेत. मला विश्वास आहे की, संजय राऊतांना नवाब मलिकांच्या शेजारी राहायला जावं लागणार आहे.संजय राऊत यांची लूटमार, माफियागिरीचे मी पुरावे दिले होते,"

"महाविकास आघाडी राऊतांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. राज्यातील जनतेची लूट करणाऱ्या संजय राऊतांचा आज हिशोब होणार आहे. आता कारवाई सुरु आहे. राऊतांची धावपळ सुरु होती, आता त्यांना हिशोब द्यायला जावंच लागणार आहे," असे सोमय्या म्हणाले.

ईडीने याआधी कारवाई करत खासदार संजय राऊत यांची अलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील घर जप्त केले आहे. ही कारवाई काही दिवसांआधी करण्यात आली होती. एकूण 11 कोटी 15 लाख 56 हजार 573 रुपयांच्या स्थावर मालमत्ता आतापर्यंत ईडीने जप्त केली आहे.

Sanjay Raut,  Kirit sommiya
Nitesh Rane : रोज सर्वांची सकाळ खराब करणाऱ्याचीच सकाळ आज खराब झाली, चांगले वाटतंय !

ईडीने पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्यानं आज EDची टीम थेट संजय राऊत यांच्या घरी पोहोचली आहे. शिवसैनिकांची राऊतांच्या बंगल्यासमोर गर्दी केली आहे. त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते जोरजोर घोषणा देत आहेत.

गरीब मराठी लोकांना आज न्याय भेटेल..

"रोज सर्वांची सकाळ खराब करणाऱ्याची सकाळ आज खराब झाली यामुळे चांगले वाटतंय, पत्राचाळीत राहणाऱ्या गरीब मराठी लोकांना आज न्याय भेटेल. राऊत झुकेगा नही असे म्हणत होते, मात्र आता आत सुकेंगा नही असे विचारा त्यांना," असा टोला भाजपचे आमदार नितेश राणेंनी लगावला आहे.

सुडाचे राजकारण सुरू

"या प्रकरणात संजय राऊत् यांचा काही संबंध नाही," असे शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. लोकसभेचे अधिवेशन सुरू असल्याने ते चौकशीला गेले नाही, त्यांनी वेळ मागितला होता. मात्र हे सुडाचे राजकारण सुरू आहे. संजय राऊतांच्या बोलण्यामुळे, आणि सामनातील अग्रलेखांमधून होणाऱ्या टीकेचा सुड उगवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. उद्धव ठाकरेंना दाखवायचे आहे की बघा तुमच्या जवळच्या माणसांना देखील आम्ही अटक करू शकतो. शरण या नाही तर ईडीची कारवाई होईल असे म्हणताना अरविंद सावंत म्हणाले की केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे असा आरोप केंद्र सरकारवर केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com