Cabinet Expansion: मंत्री कोण होणार यापेक्षा कुणाला डच्चू मिळणार याचीच चर्चा अधिक; भाजपाच्या मंत्र्यांमध्ये धास्ती !

Cabinet Expansion Maharashtra : भाजपाच्या किमान तीन विद्यमान मंत्र्यांना घरी बसविण्यात येणार असल्याची चर्चा
Eknath Shinde and Devendra Fadnavis
Eknath Shinde and Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राज्य मंत्रीमंडळाच्या विस्ताराची चर्चा जोरात सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत १९ जूनपूर्वी विस्तार होणारच असा नवा दावा आता केला जातोय. त्यामुळे साहजिकच इच्छुकांच्या नावांची चर्चा सुरू झाली. मात्र, आज इच्छुकांपेक्षा कुणाला वगळणार याची चर्चा सुरू झाल्याने भाजपाच्या मंत्र्यांमध्ये धास्ती वाढली आहे. भाजपाच्या किमान तीन विद्यमान मंत्र्यांना घरी बसविण्यात येणार असल्याची चर्चा मुंबईतील वर्तुळात सुरू झाली आहे.

मंत्रीपद घेऊन सरकारची कामगिरी लोकांत पोचविण्यात कमी पडलेल्या तसेच लोकसभा निवडणुकीत ताकद दाखवू न शकणाऱ्यांना ‘नारळ‘ मिळू शकतो. त्यामुळे नव्या मंत्र्यांच्या नावाबरोबरच बाहेरचा रस्ता कुणाला दाखवणार याचीच चर्चा अधिक आहे. मंत्रीमंडळ विस्तारावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. त्यामुळे येत्या १५ दिवसात विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Eknath Shinde and Devendra Fadnavis
Shivsena-BJP: दिव्याचे बॅनर डोंबिवलीत झळकले; शिंदे-भाजपाचे इथेही सूत जुळेना !

नव्या विस्तारात लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने विचार करून निर्णय घेण्यात येणार आहे. निवडणुकीत एक-एक जागा निवडून आणण्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्यांनाच मंत्रीपद दिले जाईल. कुणाला वगळायचे याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत झाल्याचे समजते.

सध्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यासह वीसजण मंत्रीमंडळात आहेत. यातील कुणाचे मंत्रीपद जाणार याचा अंदाज इतर कुणाला नसला तरी शाह-शिंदे व फडणवीस यांना नक्की आहे. या चर्चेमुळे भाजपाच्या मंत्र्यांची धाकधूक मात्र वाढली आहे. येत्या काळात लोकसभेबरोबरच राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांदेखील भाजपासाठी तितक्याच महत्वाच्या आहेत.

Eknath Shinde and Devendra Fadnavis
Konkan News : भाजपच्या माजी आमदाराने वाढले शिंदे गटाचे टेन्शन : रायगडमधून लोकसभा लढण्याची व्यक्त केली इच्छा

मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या सरकाला अकरा महिने पूर्ण झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून मंत्रीमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू आहे. शिवसेनेबरोबरच भाजपातील अनेक इच्छुक विस्ताराच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र, अनेकवेळा चर्चा झाल्यानंतरही विस्तार होत नाही. यापूर्वी असे अनेक मुहूर्त हुकले आहेत. आता यावेळी विस्तार नक्की होईल, असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात विस्तारची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

Edited By-Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com