BMC Mayor News: मुंबईचा महापौर कोण होणार? ठाकरे बंधू,फडणवीसांच्या दाव्यानंतर काँग्रेसची रोखठोक भूमिका आली समोर

Congress Election News 2026: प्रशासकाच्या काळात भाजपने अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुंबई महापालिकेची तिजोरी रिकामी केली. एवढेच नव्हे तर मुंबई महापालिकेवर 13 हजार कोटींचा कर्जाचा बोजा चढवला आहे. विकासाच्या नावावर नुसती उधळपट्टी करण्यात आली.
Congress Mumbai BMC election
Congress Mumbai BMC election Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: सध्या मुंबईचा महापौर कोण यावरच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार रंगला आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांनी मराठी माणूस महापौर होणार असल्याचा दावा केला तर मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठी असेल असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यास प्रत्युत्तर दिले आहे. आता या वादात काँग्रेसने (Congress) उडी घेतली आहे. मुंबईचा महापौर हा भारतीय आणि महाराष्ट्राचा होणार अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ घेतली आहे.

भाजपकडे काही मुद्दे नसतात. मतविभाजन आणि ध्रुवीकरण याचाच राजकीय वापर भाजपच्यावतीने प्रत्येक निवडणुकीत करते. हिंदु-मुस्लिम, मराठी आणि अमराठी तर कधी नामकरण असे मुद्दे उकरून काढले जातात. हेच मुद्दे भाजपच्या अजेंड्यावर असतात. टक्केवारीसाठी त्यांना सत्ता हवी असते. मुंबई महापालिकेकडे 90 हजार कोटींच्या ठेवी होत्या.

प्रशासकाच्या काळात भाजपने अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुंबई महापालिकेची तिजोरी रिकामी केली. एवढेच नव्हे तर मुंबई महापालिकेवर 13 हजार कोटींचा कर्जाचा बोजा चढवला आहे. विकासाच्या नावावर नुसती उधळपट्टी करण्यात आली. टक्केवारी घेतल्याशिवाय भाजपचे नेते प्रकल्प मंजूर करत नाहीत. आता त्यांना मुंबई अदानीला दान करायची आहे. त्याकरिता त्यांना सत्ता हवी आहे. त्यासाठी भरमसाठ पैशाचा वापर केला जात आहे. ध्रुवीकरणासाठी हिंदी आणि मराठी असा वाद उभा केला जात असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी नागपूरमध्ये केला.

भाजपला (BJP) आता त्यांचे कार्यकर्तेसुद्धा नकोसे झाले आहे. सतरंज्या उचलून ज्यांनी पक्ष मोठा केला त्यांना घरी बसवण्यात आले आहे. बाहेरून आलेल्यांना तिकिटे वाटल्या. ज्यांच्याकडे पैसा त्यांना तिकिटे वाटल्या. त्यानंतर पैशाचे आमिष देऊन अनेकांना निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यायला लावली.

Congress Mumbai BMC election
BJP Vs Ajit Pawar : भाजप अजितदादांचा डाव त्यांच्यावरच उलटवणार? बावनकुळे पत्रकारांना 'त्या' प्रश्नावर म्हणाले, 'अजून निकाल लागलेला नाही'

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरातच तीन जणांना तिकिटे देण्यात आल्या. विरोधकांना धमकावून विड्रॉल करायला लावले. या घटनेचे सीसीटी व्ही फुटजही गायब करण्यात आले आहे. आम्ही याची चौकशी करण्याचे पत्र निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. ज्या जागेवर बिनविरोध नगरसेवक निवडून आले तेथे पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com