Raj Thackeray's car:
Raj Thackeray's car:Sarkarnama

Raj Thackeray's New Car: राज ठाकरेंच्या नव्या कारची का होतेय चर्चा?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कार प्रेम जगजाहीर आहे.
Published on

Raj Thackeray's Car: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कार प्रेम जगजाहीर आहे. त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यात नुकत्याच दोन नव्या कोऱ्या कारचा समावेश झाला. अनेक वर्षांनी राज ठाकरे यांच्या ताफ्यात काल (१२ फेब्रुवारी) टोयोटा कंपनीची नवी लँड क्रूझर(Toyota Land Cruiser) दाखल झाली आहे. या कारची किंमत जवळपास चार कोटी रुपये आहे. 15 दिवसांपूर्वी त्यांनी पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासाठीही नवी गाडी टोयोटा वेल्फायर(Toyota Vellfire) कार खरेदी केली होती.

राज ठाकरेंच्या या नव्या कारची सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच त्यांनी पांढऱ्या रंगाला पसंती दिली आहे. याशिवाय आपल्या कारसाठी त्यांनी लकी नंबरचीच निवड केली आहे. नव्या गाडीसाठी त्यांनी 9 या लकी नंबरचीच निवड केली आहे. राज ठाकरे यांच्याकडे यापूर्वीच मर्सिडीजची सेडान कार आहे. ते नेहमी याच कारने प्रवास करताना दिसतात. स्वत: कार चालवण्यात त्यांना एक वेगळाच आनंद मिळतो.

Raj Thackeray's car:
Jitendra Awhad : 'सुडाचे राजकारण..' ; राष्ट्रवादी-शिंदे गटातील संघर्ष पेटला, आव्हाडांच्या नावाचा फलक...

पंधरा वर्षांपूर्वी म्हणजे २००९ मध्ये त्यांनी सेडान कारसह टोयोटाची लँड क्रुझर एसयूव्ही कार खरेदी केली होती. अनेक सेलिब्रिटीं पूर्वी हीच कार वापरत असायचे. या कारला सहजपणे बुलेटप्रुफ करता येऊ शकतं. या कारची ऑफरोडिंगही जबरदस्त असल्यामुळे पूर्वी या कारला अधिक पसंती दिली जायची. राज ठाकरे यांचं तीन सी वर प्रचंड प्रेम आहे. एक म्हणजे सिनेमा, कार आणि कार्टुन. त्यांच्याकडे सेडान कारसह टोयोटाची जुन्या पिढीतील लँड क्रुझर एसयूव्ही कारही आहे.

९ नंबरच का?

9 नंबर हा राज ठाकरेंचा लकी नंबर आहे. आजतागायत त्यांचं 9 नंबरवरचं प्रेम कमी झालं नाही. नऊ नंबरची खास बाब म्हणजे त्यांनी आपला मुलगा अमित ठाकरे यांच्या विवाह सोहळ्यातही त्यांनी 9 या नंबरची निवड केली होती. 9 मार्च 2006 रोजी मनसेची स्थापना करण्यात आली होती. आपल्या कारच्या नंबरसाठीही त्यांनी 9 चीच निवड केली. आताही घेतलेल्या नव्या कारसाठी त्यांनी 9 नंबरच निवडला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com