शिवसेनेच्या जागेवर भाजप सांगणार दावा? शिंदे गटाकडे निवडणूक चिन्हच नाही!

Andheri East By Election - शिवसेनेकडून दिवंगत आमदार लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी.
शिवसेनेच्या जागेवर भाजप सांगणार दावा? शिंदे गटाकडे निवडणूक चिन्हच नाही!

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने अद्यापपर्यंत निवडणूक चिन्हाची कोणतीही कायदेशीर तजवीज केलेले नाही. त्यामुळे अंधेरी (पूर्व) मतदारसंघातील तीन नोव्हेंबरला होणाऱ्या पोटनिवडणूकीत शिंदे गट नाही तर भाजपच उतरणार आहे. शिवसेनेतल्या अभुतपूर्व फुटीनंतर पहिल्यांदाच निवडणूक पार पडत आहे. या पोटनिवडणूकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर मात करण्यासाठी भाजपने कंबर कसायला सुरूवात केली आहे.

१२ मे रोजी शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही जागा शिवसेनेकडे होती. यामुळे शिंदे गटाकडून यावर दावा करण्यात येत होता. आमदार लटके यांचे मुख्यमंत्री शिंदेंशी निकटचे संबंध होते. लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्या विरोधात आपण लढत करू नये, असेही शिंदे गटातील काही नेत्यांना वाटत होते.

शिवसेनेच्या जागेवर भाजप सांगणार दावा? शिंदे गटाकडे निवडणूक चिन्हच नाही!
एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याला जाणार तरी कोण?

मुख्य म्हणजे सद्या शिंदे गटाकडे निवडणूक चिन्हच उपलब्ध नाही. खरी शिवसेना कोण, या संघर्षावर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या पोटनिवडणुक उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीआधी निर्णय होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे आता ही जागा भाजपनेच लढवावी, असे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा मानस आहे.

२०१९ मध्ये शिवसेना-भाजप अशी युती असताना सदरची जागा शिवसेनेला गेल्याने भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. दिवंगत आमदार लटके यांनी १६९६५ मतांनी त्यांचा पराभव केला, तरीही ४५८०८ मते मिळवून ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. आताच्या पोटनिवडणूकीसाठी मुरजी पटेल यांनी निवडणूक लढविण्याची जोरदार तयारीही सुरू केली आहे.

शिवसेनेच्या जागेवर भाजप सांगणार दावा? शिंदे गटाकडे निवडणूक चिन्हच नाही!
Crime: १४ लाखांचा गांजा पिकवणाऱ्या वृध्दाची कारागृहात आत्महत्त्या

मात्र ही जागा कोणी लढवायची व आपला उमेदवार कोण असावा याबाबत भाजपनकडून एकमताने प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळाकडे तो सुपूर्द केला जाईल, त्यानंतरच याची अधिकृत घोषणा होईल, असे सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com