Congress Leader Baba Siddique: चौकशीच्या ससेमिऱ्याने मुंबईतील काँग्रेस नेत्याचे गळाले 'ग्लॅमर'..!

Congress Political News : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणच्या घोटाळ्यात बाबा सिद्दीकी 2017 पासून तपासयंत्रणांच्या रडारवर
Baba Siddique | Zeehan Siddique
Baba Siddique | Zeehan SiddiqueSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसची बारी आली आहे. मिलिंद देवरा यांना शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश, ही काँग्रेसमधील फुटीची सुरुवात असल्याची शंका आली होती, ती आता खरी ठरत आहे. 2017 पासून तपासयंत्रणांकडून चौकशीचा ससेमिरा मागे लागलेले काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत. ज्यांना थेट भाजपमध्ये प्रवेश घ्यायचा नाही, त्यांना आता अजित पवार गटाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

बाबा सिद्दीकी हे मुंबईतील काँग्रेसचे बडे प्रस्थ. चंदेरी दुनियेतील ताऱ्यांचा त्यांच्याकडे राबता असतो. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांची ग्लॅमरस नेते म्हणून ओळख आहे. त्यांचे पुत्र झीशान सिद्दीकी हे वांद्रे पूर्व मतदारसंघातून काँग्रसचे आमदार आहेत. झीशान हे युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्षही आहेत. मी काँग्रसेमध्येच राहणार, वडिलांचे काय, हे त्यांनाच विचारा, असे सांगू त्यांनी त्यांच्याबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

Baba Siddique | Zeehan Siddique
Baba Siddique News: देवरांनंतर सिद्दीकी पितापुत्र काँग्रेस सोडणार? अजितदादा गटातील प्रवेशाबाबत बाबा सिद्दीकी म्हणाले...

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) घोटाळ्यात ते रडारवर आले. त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला. त्यांच्या विविध ठिकाणांवर तपास यंत्रणांनी छापे मारले होते. मनी लाँड्रिंग प्रकरणात 2018 मध्ये त्यांची 462 कोटींची मालमत्ता तपास यंत्रणांनी ताब्यात घेतली होती.

मूळचे बिहारचे (पाटणा) असलेले बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांचा विद्यार्थीदशेतच राजकारणाशी संबंध आला. त्यानंतर ते मुंबई महापालिकेचे नगरसवेक झाले. त्यांनी 1999, 2004 आणि 2009 असे तीनवेळा वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2004 ते 2008 दरम्यान त्यांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्रिपदही त्यांनी सांभाळले आहे. म्हाडाच्या मुंबई विभागाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. रमजान महिन्यात त्यांच्या इफ्तार पार्टीला बड्या राजकीय नेत्यांसह चंदेरी दुनियेतील तारेही हजेरी लावतात. 2014 मध्ये भाजपचे आशिष शेलार यांनी त्यांचा पराभव केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2019 मध्ये त्यांनी पुत्र झीशान यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. वांद्रे पूर्व मतदारसंघात झीशान सिद्दीकी, शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर आणि भाजपच्या तृप्ती सावंत अशी लढत झाली होती. मतविभागणीमुळे झीशान यांचा विजय झाला होता. त्यामुळे महापालिका निवडणुकीत बाबा सिद्दीकी यांचा अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या गटला किती फायदा होईल, याबाबत शंका आहे.

कुख्यात दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित असलेल्याशी व्यवहार केल्याचा आरोप असणारे राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांना अजित पवार गटात घेण्यास महायुतीतील भाजप आणि शिवसेनेने विरोध केला होता. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांना एका मुस्लिम चेहऱ्याची गरज होती, ती बाबा सिद्दीकी यांच्यामुळे पूर्ण होणार आहे.

Baba Siddique | Zeehan Siddique
Chhagan Bhujbal : दमानियांचा दावा भुजबळांनी काढला निकाली; म्हणाले, भाजपचं कोणतंही प्रपोजल माझ्याकडे नाही

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात सिद्दीकी यांनी घोटाळा केल्याचा आरोप आहे. सर्वसामान्य मुस्लिम नागरिकांमध्ये त्यांची प्रतिमा चांगली नाही, असे सांगितले जाते. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात जमीन घेऊनही त्यांनी काही नागरिकांना घरे दिली नाहीत, असा आरोप त्यांच्यावर केला जातो.

या प्रकरणात 2017 पासून त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. त्यातून त्यांना सुटका हवी आहे, त्यासाठी ते अजितदादा गटाला जवळ करत आहेत, असे सांगितले जात आहे. नाही म्हटले तरी त्यांचा मतदारांचा बेस हा मुस्लिम समाजात आहेत. त्यामुळे ते थेट भाजपमध्ये प्रवेश करू शकत नाहीत, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेशाचा त्यांचा प्रयत्न आहे. यासंदर्भात त्यांनी अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याचे वृत्त आहे.

चौकशांचा ससेमिरा आणि मग त्यानंतर पक्षाला सोडचिठ्ठी, हे आता राज्यात नवीन राहिलेले नाही, मात्र शिवसेना आणि काँग्रेसमध्ये फूट पडत असताना काँग्रेस (Congress) मात्र अभेद्य असल्याचे चित्र निर्माण झाले होते, ते वरवरचे होते, हे देवरा आणि आता सिद्दीकी यांच्यामुळे समोर आले आहे. राज्यात पुन्हा भूकंप होणार, असे भाजपचे काही नेते वारंवार सांगत होते. ते खरे ठरत आहे.

Baba Siddique | Zeehan Siddique
Lok Sabha Election 2024 : बिहारमध्ये आता 'चिराग' पेटला; नितीशकुमारांमुळे भाजपला निवडणुकीत बसणार दणका?

तीनवेळा आमदारकी, एकदा मंत्रिपद, म्हाडाचे अध्यक्षपद, मुलाला आमदारकी, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्षपद.... एखाद्या पक्षाकडून आणखी काय मिळायचे बाकी असेल? सत्तेसोबत संघर्ष करण्याची तयारी नसलेले सिद्दीकी यांच्यासारखे नेते विरोधकांच्या गळाला अलगद लागतात. ही सुरुवात आहे, काँग्रेसला आगामी कळात आणखीही धक्के बसणार आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Baba Siddique | Zeehan Siddique
BMC Politics : ठाकरेंसोबत ब्रेक-अप, शिंदेंसोबत पॅच-अप अन् चहलसाहेबांचा नवा गेट-अप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com