Sanjay Raut on CAG Report : आता 'कॅग' वरही धाडी टाकणार का? संजय राऊतांचा भाजपला चिमटा

CAG Report : भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) च्या ताज्या अहवालात मोदी सरकारच्या सात योजनांमधील गैरव्यवहार उघड झाले आहेत.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

Sanjay Raut News : भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) च्या ताज्या अहवालात सात योजनांमधील गैरव्यवहार उघड झाले आहेत. केंद्रातील मोदी सरकारच्या भारतमाला प्रकल्प-1, द्वारका द्रुतगती मार्ग, अयोध्या विकास प्रकल्प, आयुष्मान भारत योजना, NHAI टोल योजना, HAL मधील डिझाईन आणि बांधकामातील त्रुटी आणि ग्रामीण विकास विभागाच्या निवृत्ती वेतनाचा पैसा प्रसिद्धीसाठी वापरण्यात आल्याचा खुलासा या अहवालात करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

यावरून खासदार संजय राऊत यांनी थेट केंद्रसरकारवर निशाणा साधला आहे. आता केंद्र सरकार कॅग'वर इडीच्या धाडी टाकणार का, द्वारका, यमुना एक्सप्रेस वे यांच्या एक-एक किलोमीटरच्या कामात जे काही कोट्यवधींचे गफले झालेत, आता कॅगला देशद्रोही ठरवणार का, त्यांनी तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढला, असा टोला लगावत खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.

Sanjay Raut
Adhir Ranjan Chaudhari : अधीर रंजन चौधरींच्या निलंबनाचा होणार फैसला; विशेषाधिकार समिती करणार चर्चा

दुसरीकडे काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. "एक संस्था प्रामाणिक पंतप्रधानांना भ्रष्ट ठरवत आहे. यावर पंतप्रधानांनी कठोर कारवाई करावी. याविरोधात ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग तैनात करून कॅगला धडा शिकवला पाहिजे. पीएम मोदींची प्रतिमा मलिन करणाऱ्या या संस्थांना देशद्रोही ठरवावे, त्यांना तुरुंगात टाकावे.

“ही संस्था तुम्हाला प्रश्न कसा विचारु शकते? या देशद्रोही संघटनेला टाळे ठोका. पण मोदीजी, कोणीतरी तुमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहे. त्याबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पुढच्या निवडणुकीत आपण परत येणार नाही, असे कॅगला वाटत आहे. म्हणूनच कॅगने तुम्हाला सवाल केले आहेत ?" असा टोलाही सुप्रिया श्रीनेत यांनी लगावला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com