

Shrikant Shinde: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून जी राजकीय खळबळ माजली आहे. त्यानुसार, ठाकरेंचे फुटलेले खासदार आजच्या शिंदेसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात दिसणार का? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केलं असून याची माहिती देताना त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. पण या सर्व घडामोडी त्यांनी स्वतः दिल्लीतून हाताळल्या का? यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माध्यांच्या प्रतिनिधींशी बोलाताना त्यांनी हे भाष्य केलं आहे.
कथित ऑपरेशन टायगरच्या मागे श्रीकांत शिंदे हेच मास्टरमाईंड आहेत, अशी चर्चा सुरु आहे. यावर बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, १६-१७ तारखेला मी दिल्लीत नव्हतोच, मी गावी महाबळेश्वरला गेलो होतो. त्याचबरोबर दोन दिवसांत ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांबाबात दोन दिवसांत तुम्हाला इत्यंभूत माहिती ऑन रेकॉर्ड सगळी माहिती तुम्हाला कळेल. ज्याची सर्वांना उत्सुकता आहे ते ठाकरेंचे खासदार आज मेळाव्याला हजेरी लावणार आहेत का? यावर बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, तो विषयच नाही आज इथे. त्यांच्या या प्रतिक्रेयवरुन आजच्या मेळाव्यात ठाकरेंचे फुटलेले ६ खासदार उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, राज्यात एकनाथ शिंदे तर केंद्रात श्रीकांत शिंदे अशी सध्या शिवसेनेची रणनीती असल्याचीही चर्चा आहे. त्यावर बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, पक्षाचं काम हे करण्यासाठी शिंदेंनी आम्हाला आदेश दिले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत, यामध्ये कुठलीही जबाबदारी चांगल्याप्रकारे पेलली गेली पाहिजे आणि काम झालं पाहिजे. या उद्देशांन आम्ही झटून काम करत आहोत.
त्याचबरोबर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नुकतीच श्रीकांतशिंदेंसाठी केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद मिळावं अशी इच्छा व्यक्त केली होती. या चर्चेवर बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, मी एक कार्यकर्ता असून पक्ष संघटना वाढीच काम करायला मला आवडतं. महाराष्ट्रात विविध भागात आमचे दौरे सुरु आहेत, आत्तापर्यंत ६५ विधानसभा मतदारसंघात आम्ही गेलो आहोत. यामध्ये पक्ष कसा वाढेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.