Swiss Banks: भारतीयांच्या पैशाबाबत स्विस बँकेचा मोठा खुलासा! खात्यातील रक्कमा वाढल्या, भारतीयांचा वेगळा हिशोब ठेवणार; कारण काय?

Swiss Banks: काळ्या पैशाचं नाव निघालं की आपल्याला स्विस बँक आठवते. याच स्विस बँकेनं आता भारतीयांच्या पैशाबाबत महत्वाचा खुलासा केला आहे.
Swiss Banks
Swiss Banks
Published on
Updated on

Swiss Banks: स्विस बँकेत जमा झालेल्या भारतीय नागरिकांच्या पैशात ८ टक्क्यांनी घट झाली आहे. स्विस सेंट्रलबँकेद्वारे गुरुवारी जाहीर झालेल्या आकड्यांमधून हा खुलासा झाला आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, या रक्कमेत घट होऊन ती ३.२५ अब्ज स्विस फ्रँक इतकी राहिली आहे. याचं मुल्य भारतीय रुपयांमध्ये ३६,७९३ कोटी रुपये इतकं आहे. स्वित्झलँडच्या आर्थिक संस्था आणि स्थानिक बँकांच्या शाखांमध्ये हा पैसा ठेवण्यात आला आहे.

Swiss Banks
Abhijeet Dipke Assaulted : CJPच्या अभिजीत दिपकेंना मारहाण! आंदोलनादरम्यान भाषण करत असताना झाला हल्ला

स्विस नॅशनल बँकेच्या माहितीनुसार, ३,२५०.५ मिलियन स्विस फ्रँक (सुमारे ३६,७९३ कोटी रुपये) ही एकूण रक्कम जी २०२५ च्या शेवटापर्यंत स्विस बँकांमध्ये भारतीय नागरिकानी ठेवलेली आहे. म्हणजेच हा तोच पैसा आहे, ज्यासाठी स्विस बँक भारतीय ग्राहकांना जबाबदार आहे. या रक्कमेचा सर्वाधिक हिस्सा म्हणजे २.६ अब्ज स्विस फ्रँक हा बँकांच्या देय रक्कमेच्या रुपात ठेवण्यात आला आहे. याचा अर्थ असा आहे की, हा पैसा अन्य बँकिंग आणि वित्तीय सस्थांच्या माध्यमातून स्वित्झर्लंडपर्यंत पोहोचला आहे. या श्रेणीमध्ये या वर्षी सुमारे १५ टक्के घट नोंदवण्यात आली आहे. पण ग्राहकांद्वारे जमा करण्यात आलेला पैसा काहीतरी वेगळंच सांगू इच्छित आहे.

Swiss Banks
Operation Tiger : ओम राजेनिंबाळकर कसे फुटले? कोणावर होती जबाबदारी? पुण्यातून दिल्लीला कसे पोहोचले? वाचा Inside Story

ग्राहकांनी भरपूर पैसे जमा केले

व्यक्तिगत आणि संस्थात्मक ग्राहकांच्या खात्यात जमा झालेला पैसा हा २०२५ मध्ये ५० टक्क्यांनी वाढून ५२४ मिलियन स्विस फ्रँक (६००० कोटी रुपये) इतका झाला आहे. ही वाढ खूपच मोठी असून तरीही स्विस बँकेत भारतीय नागरिकांच्या पैशाच्या एकूण केवळ १६ टक्के इतकी आहे.

भारतीयांच्या पैशाचा हिशोब वेगळा

स्विस बँकेत भारतीयांच्या थेट जमा पैशांचा एक वेगळाच हिशोब BIS (बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट) ठेवला जातो. ज्याला भारत आणि स्वित्झर्लंड या दोन्हीही देशांकडून अधिक विश्वासार्ह मानले जाते. त्यानुसार, २०२५ मध्ये भारतीयांच्या जमा पैशामध्ये २० टक्क्यांनी वाढ होऊन ती सुमारे ८९.७३ मिलियन डॉलर इतकी झाली आहे. यापूर्वी २०२४ मध्ये यामध्ये ६ टक्क्यांनी वाढ झाली होती. तत्पूर्वी तीन वर्षे सातत्यानं यात घट होत राहिली. पण हा पैसा २००७ मध्ये २.३ अब्ज डॉलरहून अधिक होता, पण आता यापेक्षा खूपच कमी आहे.

Swiss Banks
Shiv Sena split news : 'ऑपरेशन टायगर'च्या वाटाघाटींमध्ये राजाभाऊंसमोर ओमराजेंचा 'मीटर' फुटला!

भारतीयांच्या पैशात होतेय घट

पीटीआयच्या माहितीनुसार, २०२५ मध्ये भारतीयांशी संबंधित एकूण रक्कमेमध्ये झालेली घट ही २०२४ मध्ये झालेल्या वेगवान वाढीनंतर झाली आहे. २०२४ मध्ये स्विस बँकेत भारतीयांचा एकूण पैसा वाढून ३.५ अब्ज स्विस फ्रँक इतका झाला आहे. २०२१ नंतर याचा सर्वात वरचा स्तर होता. यापूर्वी २०२१ मध्ये ही रक्कम ३.८३ अब्ज स्विस फ्रँकपर्यंत पोहोचली होती. जी १४ वर्षात सर्वाधिक होती.

काळा पैसा नाही

यामध्ये ही गोष्ट देखील ध्यानात घेतली पाहिजे की, हे आकडे स्विस नॅशनल बँकेद्वारे त्यांच्याकडच्या इतर बँकांमध्ये अधिकृत माहितीनुसार आहे. यांना स्वित्झर्लंडमधील भारतीयांच्या कथित काळा पैसा असं संबोधता येणार नाही. याशिवाय यामध्ये तो पैसा देखील समाविष्ट नाही जो भारतीय, एनआरआय किंवा अन्य भारतीयांनी दुसऱ्याच देशातील कंपन्यांमार्फत किंवा संस्थांमार्फत स्विस बँकांमध्ये ठेवला आहे.

Swiss Banks
Monsoon Forecast 2026 : चिंता वाढली! 'यंदा मान्सून हुलकावणी देणार? पुढील 5 महिने चिंतेचे, काय सांगतोय नवा अहवाल

भारताचं स्थान कुठे?

भारताच्या स्थितीबाबत बोलायचं झाल्यास स्विस बँकांमध्ये पैसे ठेवणाऱ्या देशांच्या यादीत भारत २०२४ मध्ये ४८ व्या स्थानी होता. जे स्थान २०२५ मध्ये वाढून ४६ व्या स्थानावर पोहोचलं. त्यातच भारतीय ग्राहकांच्या एकूण संपत्तीमध्ये २०२४ च्या शेवटापर्यंत १.५ अब्ज स्विस फ्रँक होते जे गेल्यावर्षीच्या तुलनेत सुमारे ६ टक्क्यांनी कमी होते.

भारताच्या शेजारील देशांचा किती पैसा स्विस बँकेत

भारताच्या शेजारील देशांपैकी पाकिस्तान आणि बांगलादेशच्या स्विस बँकांमध्ये जमा झालेल्या पैशात देखील बदल झालेला पाहायला मिळाला. पाकिस्तानच्या ग्राहकांचा स्विस बँकांमध्ये जमा पैसा हा २७२ मिलियन स्विस फ्रँक इतका आहे. ज्यात सध्या घट होऊन तो २५७ मिलियन फ्रँक इतका शिल्लक राहिला आहे. या घटीनंतर पाकिस्तानच्या रँकिंगमध्ये घसरण होऊन ते १०८ व्या स्थानावर पोहोचले आहेत. तर दुसरीकडं बांगलादेशबाबत एकदम विरुद्ध परिस्थिती आहे. स्विस बँकेत त्यांचा ४३ टक्क्यांनी पैसा वाढला आहे. ही रक्कम ८४२ मिलियन स्विस फ्रँक झाली आहे. त्याचबरोबर २०२४ च्या शेवटापर्यंत बांगलादेश ८१ व्या स्थानावर पोहोचला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com