Latest Political News: विधवा महिलांना 'गंगा भागीरथी' म्हणण्यावरून राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. विधवा महिलांना 'गंगा भागीरथी' असं बोलण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे एक पत्र व्हायरल झाले. या सर्व पार्श्वभूमीवर महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत सष्टीकरण दिले आहे.
मंगलप्रभात लोढा म्हणाले, ''विधवा महिलांना 'गंगा भागीरथी' म्हणण्याचा असा कोणताही निर्णय झालेला नाही. तर 'गंगा भागिरथी'सह अजून काही शब्द आपण चर्चेसाठी विभागाला पाठवले होते. मात्र, याबाबत अद्याप कोणताच निर्णय झाला नाही. तसेच याबाबतचा जीआरही निघालेला नाही'', असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
''विधवा महिलांच्या नावापुढे काय शब्द वापरावे याविषयी चर्चा झाली. यावेळी अनेक शब्द सुचवण्यात आले. यामध्ये गंगा भागीरथी हा शब्दही सूचवण्यात आला होता. पण याबबात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पण एक पत्र सध्या व्हायरल झालं आहे, याआधी देखील एक असच पत्र व्हायरल झालं होतं'', असंही ते म्हणाले.
''महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. याबबातचे पत्र विभागाला पाठवलं ते पत्र चर्चेसाठी पाठवलं होतं. तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना देखील विचारा. त्यांनी नाव बदलण्यास सांगितलं होतं.
एवढंच नाही तर त्यांनीही काही नावं सूचवली होती. यामध्ये कोणतंही नाव अंतिम झालेलं नाही. माझ्याकडे जे पत्र येतात त्यावर सही करून मी पुढे पाठवतो. त्यापैकी हे एक होते, ते मी चर्चेसाठी पुढे पाठवले'', असं स्पष्टीकरण मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी दिले.
(Edited By Ganesh Thombare)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.