Laadki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना दोन महिन्याचे 3000 हजार रुपये कधी मिळणार?

Laadki Bahin Yojana When will the ₹3000 installment: प्रशासनाकडून दोन महिन्याचे पेसे एकत्र देण्यासाठी हालचाली सुरु आहे. मे-जूनचे पैसे वटपौणिमेच्या दिवशी देण्याचे नियोजन सरकारचे सुरु असल्याचे समजते. पण याबाबत अद्याप सरकारकडून कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSarkarnama
Published on
Updated on

दोन महिन्यापासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र लाडक्या बहिणींना पैसे न मिळाल्याने त्या नाराज आहेत, पैसे कधी मिळणार अशी विचारणा त्यांच्याकडून होत आहे. प्रशासनाकडून दोन महिन्याचे पेसे एकत्र देण्यासाठी हालचाली सुरु आहे. मे-जूनचे पैसे वटपौणिमेच्या दिवशी देण्याचे नियोजन सरकारचे सुरु असल्याचे समजते. पण याबाबत अद्याप सरकारकडून कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही.

येत्या 10 जून रोजी वटपौणिमा आहे. या दिवशी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी होत आहे. हजारो महिला अपात्र ठरल्या आहेत. आश्चर्य म्हणजे सरकारी नोकरी करणाऱ्या 'लाडक्या बहिणींनी'सरकारच्या या योजनेचे पैसे हडप केल्याची माहिती समोर आली आहे.

सुमारे तीन हजार महिला ज्या सरकारी नोकरी करीत आहेत, त्यांनी योजनेचा गैरफायदा घेतला आहे. अशा 'खोटारड्या' लाडक्या बहिणींवर 'देवाभाऊ' कारवाई करणार असल्याची चर्चा होती, पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या 'सरकारी' लाडक्या बहिणींवर कारवाई करण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे 'या'बहिणींना दिलासा मिळाला आहे. अजितदादांनी सरकारी बहिणींना अभय दिला आहे.

लाडकी बहीण योजनेची अमलबजावणी करताना सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांनी योजनेचा फायदा घेतला, ही आमची चुक झाली, अशी कबुली अजितदादांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आयकर विभागाकडून लाडक्या बहिणींचे माहिती मागवण्यात येत आहे.

Ladki Bahin Yojana
Chhagan Bhujbal: मैं उस पुराने जमाने का सिक्का हूं, मुझे फेक ना देना..., मंत्रिपदाचा कार्यभारानंतर पाठविलेली आभारपत्रे!

सरकारी गलेलठ्ठ पगार असणाऱ्या लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. सरकारी नोकरी करणाऱ्या 2,652 महिलांनी लाभ घेतला आहे. राज्य सरकार त्यांना दिलेली रक्कम वसुल करणार असल्याची माहिती आहे. आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांची अशाच पद्धतीने तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com