Video Nitish Kumar : नितीश कुमारांचा पारा चढला; स्टेजवरच अधिकाऱ्याचे पाय धरण्यासाठी उठले अन्...

Bihar CM Nitish Kumar JDU : मागील काही दिवसांतील ही दुसरी घटना आहे. नितीश कुमार अधिकाऱ्यांना तुमच्या पाया पडू का, अशा शब्दांत सुनावत आहेत.
Bihar CM Nitish Kumar
Bihar CM Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

Patna : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियात व्हायरल होत आहे. काही दिवसांपुर्वीही अधिकाऱ्याला तुमच्या पाया पडतो, असे ते म्हणत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आताही अधिकाऱ्याचे पाय धरण्यासाठी नितीश कुमार खुर्चीवरून उठल्याचे दिसले.

मागील काही दिवसांतील ही दुसरी घटना आहे. एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाय धरण्यासाठी नितीश कुमार झुकल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यानंतर काही दिवसांपुर्वी आपल्या भाषणादरम्यान त्यांनी एका कामावरून अधिकाऱ्याचे पाय धरण्याची भाषा केली होती.

Bihar CM Nitish Kumar
IRS M Anusuya : सरकारचा ऐतिहासिक निर्णय; महिला IRS अधिकाऱ्याला लिंग व नाव बदलण्यास मान्यता

काय घडलं नेमकं?

पटना येथे एका कार्यक्रमात नितीश कुमार गेले होते. यावेळी उपमुख्यमंत्री स्रमाट चौधरी आणि विजय सिन्हाही उपस्थित होते. व्हायरल व्हिडिओमध्ये नितीश कुमार व्यासपीठावरील सोफ्यावर बसलेले दिसतात. अचानक उठून अधिकाऱ्याच्या दिशेने हात जोडत जाऊ लागतात. तुमचे पाय पकडतो, असे म्हणते पुढे जातात. पण काहीजण त्यांना रोखतात.

एका पुलाच्या रखडलेल्या कामावरून नितीश कुमार चांगलेच संतापलेले दिसले. फेब्रुवारीपर्यंत हा पुल पूर्ण व्हायला हवा होता. यावर्षी पर्ण झाला पाहिजे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केला. संबंधित अधिकाऱ्यांशी नंतर ते स्वतंत्रपणेही बोलले.

Bihar CM Nitish Kumar
Mallikarjun Kharge : लोकसभेमुळं खर्गे यांचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात? असं आहे राज्यसभेतील गणित…

पुलाचे काम यावर्षीच्या अखेरीस पूर्ण होईल, असे अधिकाऱ्याने सांगितल्यानंतर नितीश कुमार म्हणाले, पुलाच्या कामाला आधीच विलंब झाला आहे. त्यामुळे सगळ्यांसमोर सांगतोय, उशीर करू नका, असा इशारा नितीश कुमारांनी संबंधित अधिकाऱ्याला दिला. 

दरम्यान, पुढील काही महिन्यांवर राज्यातील विधानसभेच्या निवडणुका आहेत. यासाठी नितीश कुमार यांनी रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांमागे तगादा लावला आहे. त्यामुळेच बहुतेक कार्यक्रमांमध्ये ते थेट व्यासपीठावरून अधिकाऱ्यांवर संतापल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसांतील ही दुसरी घटना होती. राज्यात जेडीयू आणि आरजेडी या दोन पक्षांमध्ये निवडणुकीत थेट लढत होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com