MNS V/s Aaditya Thackeray : वरळीत आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेचा उमेदवार ठरला! राज ठाकरेंचा ग्रीन सिग्नल?

MNS To Field Candidate agains Aditya Thackeray In Mumbai Worli Constituency Raj Thackery Gives Green Signal : मनसेकडून महायुतीकडे 20 जागांची मागणी केली आहे. वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आमदार आहेत.
MLA Aaditya Thackeray
MLA Aaditya Thackeraysarkarnama

Aaditya Thackeray News : लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठींबा देणाऱ्या मनसेने विधासभेसाठी 20 जागांचा मागणी महायुतीकडे केली आहे. या संदर्भात साम टीव्हीने वृत्त दिले होते. मुंबईतील मतदारसंघांची मागणी मनसे केली आहे. विशेष म्हणजे मनसेकडून शिवसेना नेते, आदित्य ठाकरे यांच्या विरोधातील उमेदवार देखील ठरला आहे.

वरळीतून मनसेचे संदीप देशपांडे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. तेच आदित्य ठाकरेंच्या विरोधातील उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. यासाठी राज ठाकरेंनी देखील ग्रीन सिग्नील दिल्याची चर्चा आहे.

मनसेकडून MNS महायुतीकडे 20 जागांची मागणी केल्याचे पहिली बातमी साम टिव्हीने दिली होती. साम टिव्हीच्या वृत्तानुसार मनसेकडून मुंबईसह, पुणे आणि नाशिक मतदारसंघातील जागांची मागणी करण्यात आली आहे.

MLA Aaditya Thackeray
Ravindra Waikar Vs Amol Kirtikar: 'वायकरांचा विजय 'मॅनेज'...'; कुणी केला गंभीर आरोप,न्यायालयाचा दरवाजाही ठोठावणार

मुंबईतील दादरमधून नितीन सरदेसाई, शालिनी ठाकरे, वरळी मतदारसंघातून संदीप देशपांडे, शिवडी आणि नाशिक मतदारसंघातून बाळा नांदगावकर इच्छुक असल्याची माहिती आहे. वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे Aaditya Thackeray आमदार आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे अशी लढत होण्याची शक्यता आहे.

संदीप देशपांडे लागले तयारीला

विधानसभा निवडणुकीला 6 महिने शिल्लक असताना संदीप देशपांडे यांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. वरळी भागात मनसेकडून बॅनर लावून शक्तिप्रदर्शन देखील करण्यात येत आहे. वरळीत मराठी मतांची संख्या लक्षात घेता मनसे शिवसेनेमध्ये येथे जोरदार लढाई होण्याची चर्चा आहे.

MLA Aaditya Thackeray
Manoj Jarange Patil : खासदार बजरंग सोनवणेंनी पुन्हा घेतली मनोज जरांगेंची भेट, 'सर्व खासदारांना एकत्र करणार...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com