Rohit Pawar On Shrikant Shinde : खासदार मुलाच्या कार्यक्षमेतवर मुख्यमंत्र्यांना विश्वास नाही, आमदार रोहित पवार यांचा टोला !

Modi 3.0 Government Rohit Pawar Taunt to Ekanath Shinde over not getting chance to Dr. Shrikant Shinde in Central Cabinet : लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे 7 खासदार निवडून आले असून त्यातील एकाची वर्णी मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्री म्हणून लागली आहे.
Rohit Pawar-Shrikant Shinde
Rohit Pawar-Shrikant ShindeSarkarnama

Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडाळात खासदार श्रीकांत शिंदे यांना स्थान देण्यात आले नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी खासदार शिंदे यांना डिवचले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Ekanath Shinde यांना आपल्या मुलाच्या कार्यक्षमतेवर विश्वास नसेल, म्हणूनच त्यांना मंत्रिपद दिलं नाही, असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.

केंद्रात पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदी यांच्यासह 72 खासदारांनी केंद्रीय मंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे Ekanath Shinde Shivsena 7 खासदार निवडून आले असून त्यातील एकाची वर्णी मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्री म्हणून लागली आहे. विदर्भातील बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यातील कार्यक्षमतेवर विश्वास नसल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या मुलाला पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळात स्थान दिले नसावे, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली होती. जे काबील आहेत, त्यांनाच संधी दिली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते. त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हा त्यांना काबील वाटत नसेल, असे रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले होते. त्यावर श्रीकांत शिंदे यांनी देखील उत्तर दिले आहे. खासदार शिंदे म्हणाले, आमचा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्याला न्याय दिला आहे, असे शिंदे म्हणाले.

Rohit Pawar-Shrikant Shinde
Shivsena UBT : 'खडसेंना मंत्रिपद फडणवीसांच्या कपटी राजकारणाला चपराक', ठाकरे गटाची बोचरी टीका

पक्षसंघटनेसाठी जो कार्यकर्ता काम करतो त्याला न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. कार्यकर्ता कसा मोठा होईल, याासाठी शिंदेसाहेब करत असतात, असेही खासदार शिंदे म्हणाले. मोदी यांच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडलेले प्रतापराव जाधव हे यापूर्वी तीनवेळा या मतदारसंघातून निवडून आले असून यंदा ही चौथी टर्म आहे. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट, अशी लढत झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com