Sharmila Thackeray on Yashashree Shinde : यशश्री शिंदे हत्या प्रकरण; पोलिस आयुक्तांच्या भेटीनंतर शर्मिला ठाकरे संतापल्या

Sharmila Thackeray on Yashshree Shinde Navi Mumba Uran case : उरण येथील यशश्री शिंदेची निर्घृण हत्या झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील जोर धरत आहेत.
Sharmila Thackeray on Yashshree Shinde case
Sharmila Thackeray on Yashshree Shinde caseSarkarnama
Published on
Updated on

Navi Mumbai News, 30 July : उरण येथील यशश्री शिंदेची निर्घृण हत्या झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील जोर धरत आहेत. अशातच आज (ता.30 जुलै) रोजी मनसे नेते राज ठाकरे यांच्या पत्नी आणि मनसे नेत्या शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी यशश्रीच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

यावेळी त्यांनी यशश्री शिंदेच्या हत्येप्रकरणी नवी मुंबई पोलिस आयुक्तांची देखील भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत महिलांवर अत्याचार करणाऱ्या पुरुषांवर कोणतीही दयामाया न दाखवता, धर्म न बघता त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

नवी मुंबई (Navi Mumbai) आणि उरण परिसरात मागील काही दिवसांत महिला अत्याचारांची तीन प्रकरणे उघडकीस आली आहेत. या सर्व आरोपींवर कारवाई करावी, तसंच शक्ती कायद्याची या वर्षापासून अंमलबजावणी करा, अशी मागणी देखील शर्मिला ठाकरे यांनी केली.

पोलिस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, "आम्ही पोलिसांवर प्रचंड नाराज आहोत. यशश्री शिंदेंच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी येत असताना माझ्या समोर अशीच एक तिसरी घटना समोर आली. मुलीने नकार दिला म्हणून तिला बेदम मारहाण करण्यात आली. अशा प्रकरणात पोलिसांनी (Police) योग्य ती कारवाई करुन आपली दहशत दाखवून दिली पाहीजे."

Sharmila Thackeray on Yashshree Shinde case
Gajanan Kale: अजितदादांनी स्वतःचा पक्ष काढून 2 आमदार निवडून आणावेत! मिशी कापून हातात देवू...

शक्ती कायदा पास करा

तसंच, मागील काही दिवसांपासून अतिशय हिंस्रपद्धतीने मुलींवर अत्याचार होत आहेत. निर्भया प्रकरणातील आरोपीला अल्पवयीन असल्यामुळे सोडण्यात आलं, हे चुक आहे. ज्या मुलामध्ये इतकी विकृती आहे, त्याला आयुष्यभर तुरुंगात ठेवावे किंवा थेट फाशीची शिक्षा द्यावी.

Sharmila Thackeray on Yashshree Shinde case
Anil Deshmukh Vs Devendra Fadnavis : भाजप नेत्यांचा अतिउत्साह अन् 'परसेप्शन'च्या लढाईत फडणवीसांचा पाय खोलात...

मंदिरातील पुजारीही जर महिलांवर अत्याचार करत असतील, मुलींना फसवून त्यांच्याशी लग्न करत असतील तर त्यांच्यावर पोलिसांची दहशत असली पाहीजे. या लोकांवर पोलिसांची दहशत असलीच पाहिजे. पोलिस काय करु शकतात, हे या पुरुषांना कळलं पाहिजे. ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे पुरुष थांबणार नाहीत. त्यामुळे याच वर्षी शक्ती कायदा पास करावा, अशी पंतप्रधानांना विनंती आहे. तसंच असे गुन्हे झाले की त्यांना फाशीच झाली पाहिजे, अशी मागणी शर्मिला ठाकरेंनी यावेळी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com