Sushma Andhare : नीतू, तुझा अभ्यास फारच कच्चा : अंधारेंनी पुन्हा डिवचलं

गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार नितेश राणे आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
Nitesh Rane |Sushma Andhare
Nitesh Rane |Sushma Andhare

Sushma Andhare | गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दोघेही एकमेकांचे जुन्या भूमिकांचे व्हिडीओ शेअर करुन एकमेकांवर निशाणे साधत आहेत.

अशातच नितेश राणेंनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टिका करणारा सुषमा अंधारेंचा एक जुना व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यावर सांगा कुणी केली बाळासाहेबांसोबत गद्दारी? बाळासाहेबांवर टीका करणाऱ्यांना शिवबंधन बांधलेच कसे? असा सवालही नितेश राणे यांनी केला. त्यावर त्यामुळे सुषमा अंधारे यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेतील भाषण करतानाच जुना व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात फडणवीस नारायण राणेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचत आहेत. त्यावर अंधारेंनीही, तुझ्या वडिलांचे वस्त्रहरण करणाऱ्या देवेंद्रजींना तू नेता कसे काय मानलेस? असा सवालच नितेश राणेंना विचारला आहे. याचवेळी त्यांनी या व्हिडीओवर एक पोस्टमधून नितेश राणेंचा समाचार घेतला आहे.

Nitesh Rane |Sushma Andhare
राज ठाकरेंच्या 'त्या व्हिडीओ'वरुन अंधारेनी डिवचलं; म्हणाल्या...

वाचा, काय म्हणाल्या सुषमा अंधारे

प्रिय नीतू

बाळा ,

तुझा अभ्यास फारच कच्चा आहे . तुला अजून होमवर्क ची गरज आहे. तब्बल वीस वर्षांपूर्वीचा माझा महाविद्यालयीन वाद विवाद स्पर्धेतला व्हिडिओ शेअर करताना किमान चेहरा पट्टीतील बदल तरी तू लक्षात घ्यायला हवा होतास.

... पण असू दे बाळा. मुळात माझ्या भावाने तुझ्या अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर तू आता अशा अर्ध्या कच्च्या संकल्पना घेऊन बोलत राहिला नसतास. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल सन 2015 सालचं तुझं ट्विट ही जर तुझी आज चूक असेल तर ते तू अजूनही डिलीट का केले नाहीस किंवा गाणं सम्राज्ञी लता मंगेशकरजी या मोदीजींच्या स्टेजवर गेल्या म्हणून तू त्यांचा भारतरत्न परत मागितला या तुझ्या बालिश वक्तव्यांवर मी अजिबात बोलणार नाही.

मी तुला अस्सल व्हिडिओ तुझ्या आजमितीला असणाऱ्या प्राणप्रिय नेत्याचा तुला पाठवत आहे . भर सभागृहात आपल्याच सख्ख्या वडिलांचे म्हणजेच माझ्या भावाचे वस्त्रहरण करणाऱ्या देवेंद्रजींना तू नेता कसे काय स्वीकारले असेल बरे? हा व्हिडिओ ऐकल्यावर जर तुला काही शंका उपस्थित होणार असतील तर नक्की विचार मला पुन्हा एकदा अभ्यास घ्यायला आवडेलच .

तुझी आत्या

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com