Voter List : महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी जाहीर : तब्बल ४० लाख डुप्लिकेट मतदार, अनेकांना यादीतून वगळले!

State Election Comission : दिव्यांग आणि ट्रान्सजेंडर मतदारांची संख्या ही जाहीर!
Voter List | State Election Comission
Voter List | State Election Comission Sarkarnama
Published on
Updated on

State Election Comission : महाराष्ट्रात पुढील कालावधीत विविध जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रस्तावित आहेत. या पाठोपाठ २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक व त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. याच अनुषंगाने आता राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे. या अंतिम यादीत मतदारांची संख्या आणि वेगवेगळ्या मतदारांच्या वर्गवारीबाबत अनेक गोष्टी समोर आले आहेत.

महाराष्ट्राची अंतिम मतदारांची यादीं जाहीर करताना, निवडणूक आयोगाने काही गोष्टी नव्याने मांडल्या आहेत. महाराष्ट्रात सद्यस्थितीला एकूण ९ कोटी २ लाख ८५ हजार ८०१ मतदार आहेत. यात एक विशेष गोष्ट अशी की, डुप्लिकेट म्हणजेच दुबार मतदारांची संख्या तब्बल ४० लाखांपेक्षा अधिक असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Voter List | State Election Comission
Pune News : 'भीमा कोरेगाव' लढ्यावर पुस्तक लिहणारे रोहन जमादार यांना मुंडकं उडवण्याची धमकी!

डुप्लिकेट मतदारांच्या ४० लाख मतदारांपैकी १६ लाख मतदारांवर निवडणूक आयोगाने कारवाई केलेली आहे. १६ लाख डुप्लिकेट मतदारांना यादीतून वगळत, ही यादी रद्द केली गेली आहे. महाराष्ट्रात सद्यस्थितीत एकूण ४ कोटी ७१ लाख ३५ हजार ९९९ पुरूष मतदार असून, ४ कोटी ३१ लाख २५ हजार ६७ महिला मतदार आहेत.

Voter List | State Election Comission
Ambadas Danve News : खोके अन् दलबदलू मंडळी, एक थाली के चट्टे बट्टे...

या यादीत दिव्यांग मतदारांचीही संख्याही देण्यात आलेली आहे. राज्यात एकूण १५ हजार ३३२ दिव्यांग मतदार आहेत, तर ४७३५ ट्रान्सजेंडर मतदारांची संख्या असल्याचे निवडणूक आयोगाने दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com