ZP Election result: पालघरात मोखाडा तालूक्यात अपक्ष उमेदवार हबीब शेख विजयी

पालघरच्या पंचायत समितीत सावरा एम्बुरमध्ये शिवसेनेने आपला झेंडा फडकवला असून शिवसेनेच्या विनया पाटील बहूमताने निवडूण आल्या आहेत.
हबीब शेख
हबीब शेख सरकारनामा

पालघर: पालघर मधील मोखाडा तालुक्यातील आसे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी पुरस्कृत हबीब शेख 1661मतांनी विजयी झाले आहेत. तर बोर्डी जिल्हापरिषद गट 6 मधून भाजपच्या ज्योती पाटील यांचा 416 माताधिक्यांनी विजयी झाल्या आहेत. ज्योती पाटील यांना 5283 मते मिळाली आहेत तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीच्या उन्नती राऊत यांचं आव्हान होत. उन्नती राऊत यांना 4867 मत पडली.

हबीब शेख
ZP Election : पालघरमध्ये शिवसेनेच्या विनया पाटील विजयी

तर,राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहेत. पालघरच्या पंचायत समितीचे निकाल हाती येत आहेत. पालघरच्या पंचायत समितीत सावरा एम्बुरमध्ये शिवसेनेने आपला झेंडा फडकवला असून शिवसेनेच्या विनया पाटील बहूमताने निवडूण आल्या आहेत. पालघर जिल्हा परिषदेत 15 तर पंचायत समितीच्या 14 जागांसाठी मतदान पार पडले होते. तर जिल्ह्यात 65% मतदान झाले होते.

विनया विकास पाटील 56576 मतांनी विजयी झाल्या आहेत. तर भाजपच्या सुवर्णा सांबरे यांना 2477 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या कविता पाटील यांना 353 मतांवर समाधान मानावे लागले. बहुजन विकास आघाडीच्या प्रांजल पाटील यांना 2941 मते मिळाली आहेत. माकपच्या प्रतिभा गजानन भुयाळ यांना 956 मते मिळाली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com