Nagar Political News : कोपरगाव मतदारसंघ; उमेदवारी आणि एबी फॉर्मच्या काळे-कोल्हेंच्या दाव्याने संशयकल्लोळ...

Shinde, Fadanvis government शिंदे, फडणवीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचा अजित पवार गटही सामिल झाल्याने अनेक विधानसभा मतदारसंघातील चित्र बदललंय. एकमेकांच्या विरोधात विधानसभा लढलेले उमेदवार आता एकत्र आलेत.
Snehalata Kolhe, Asutosh Kale
Snehalata Kolhe, Asutosh Kalesarkarnama
Published on
Updated on

-राजेंद्र त्रिमुखे

Nagar Political News : "येवा उमेदवारी आपलीच आसा" अशी अपेक्षा आणि आशा कोपरगाव मतदारसंघात दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे(अजित पवार गट) आमदार आशुतोष काळे आणि भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांना आहे. त्याची कधी मार्मिक तर कधी राजकीय पद्धतीने जाहीर रेटारेटी होत असली तरी त्यातले राजकीय गांभीर्यपण मोठे आहे. काळे यांनी अजितदादांनी उमेदवारीची खात्री दिलीय तर, कोल्हे यांनी भाजपने आपला एबी फॉर्म तयार आहे, असे सांगितलंय. त्यांच्या या वक्तव्याने आतापासूनच कोपरगावात राजकीय चुरस वाढली आहे.

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे Ekanth Shinde गटाने आणि भाजपाने BJP एकत्र येत सत्ता स्थापन केल्यानंतर आता राष्ट्रवादीचा अजित पवार Ajit Pawar गटही सत्तेत सामील झाल्याने अनेक विधानसभा मतदारसंघातील चित्र बदललंय. एकमेकांच्या विरोधात विधानसभा लढलेले उमेदवार आता एकत्र आलेत. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हालाच तिकीट मिळणार, असा दावा दोन्ही उमेदवारांकडुन केला जातोय.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्मुला काय ठरतोय आणि त्यानंतर कोण बंड करणार, अशा चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचा अवघ्या आठशे मतांनी पराभव करत निवडून आले होते. गेली चार वर्षे आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवत या दोन्ही नेत्यांनी मतदारसंघात बांधणी केली होती.

मात्र, आता राष्ट्रवादी आणि भाजप दोघेही सत्तेत सहभागी झालेत. सत्ता बदलाच्या काळात अजित पवारांनी कोपरगावची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच राहणार आणि उमेदवारी ही मलाच दिली जाणार, असा शब्द दिल्याचे आमदार काळे यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या समोरच सांगितलंय.

Snehalata Kolhe, Asutosh Kale
Nagar NCP News : नगर शहराचे आरोग्य बिघडले; राष्ट्रवादीची महापालिकेत औषध फवारणी...

शासन आपल्या दारी उपक्रमाच्या आढावा बैठकीतील या वक्तव्यानंतर भाजपच्या प्रदेश सचिव आमदार स्नेहलता कोल्हे यांनीही आमच्या पक्षश्रेष्ठींनी मलाही आता एबी फॉर्म देऊ का असं सांगितलंय. अजुन पुला खालुन बरच पाणी वाहुन जायच आहे. सध्या शासन आपल्या दारीची चर्चा आहे. आशुतोष काळे उत्साहात बोलल्याच कोल्हे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हंटलय.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com