चंद्रपूर : मीनी मंत्रालयाच्या शीलेदारांना लागले विधानसभेचे वेध

सहा महिन्यांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या शिलेदारांनीही गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. गेल्या काही वर्षांपासून या शिलेदारांनी विधानसभा क्षेत्रात आपली पकड मजबूतकरण्याच्या अनुषंगाने विविध विकासकामे, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, तेथील कार्यक्रमांना हजेरी लावण्याचा सपाटा सुरू केला आहे.
चंद्रपूर : मीनी मंत्रालयाच्या शीलेदारांना लागले विधानसभेचे वेध
Published on
Updated on

चंद्रपूर : सहा महिन्यांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या शिलेदारांनीही गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. गेल्या काही वर्षांपासून या शिलेदारांनी विधानसभा क्षेत्रात आपली पकड मजबूत करण्याच्या अनुषंगाने विविध विकासकामे, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, तेथील कार्यक्रमांना हजेरी लावण्याचा सपाटा सुरू केला आहे. उमेदवारी
मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असले तरी पश्रश्रेष्ठी काय निर्णय घेतात, यावर त्यांचे नशीब अवलंबून आहे.

56 सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेवर भाजपचे वर्चस्व आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे 33 सदस्य निवडून आले. विजयी झालेले तीन अपक्ष उमेदवार भाजपचेच होते. त्यांची निवडणुकीनंतर घरवापसी झाली. त्यामुळे भाजपचे संख्याबळ आता 36 झाले आहे. कॉंग्रेसचे अठरा उमेदवार विजयी झाले.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तीन-चारदा विजयी झालेल्या उमेदवारांत कॉंग्रेसचे डॉ. सतीश वारजूकर, भाजपच्या संध्याताई गुरनुले, अध्यक्ष देवराव भोंगळे, समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, डॉ. आसावरी देवतळे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. राजकारणाचा अनुभव आल्यानंतर या सदस्यांना आता आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. यासोबतच जिल्हा परिषदेच्या या शीलेदारांसह उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, संजय गजपुरे यांनीही विधानसभेसाठी तयारी चालविली आहे.

जिल्ह्यात सहा विधानसभा मतदार संघ आहेत. त्यात चंद्रपूर, वरोरा, चिमूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी आणि राजुरा विधानसभेचा समावेश होतो. 

चंद्रपूर विधानसभा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या क्षेत्रातून जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांची तयारी गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. समाजमाध्यमांचा वापर करून ते आपली
कामे हायलाईट करीत आहेत. 

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळेही विधानसभेसाठी तयार आहेत. मात्र, त्यांना कोणत्या क्षेत्रातून संधीमिळेल हे येणारा काळाच सांगेल. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी राजुरा
विधानसभा क्षेत्राकडे आपला मोर्चा वळविला आहे. या क्षेत्रातील बारीकसारीक कामांवर ते नजर ठेवून आहे. अलीकडे झालेल्या सर्वच कार्यक्रमांना त्यांनी झाडुनपुसून हजेरी लावली आहे. त्यामुळे ते या क्षेत्रासाठी इच्छुक असल्याची चर्चा जोरात आहे. 

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चारदा विजयी झालेले डॉ. सतीश वारजूकर यांचीही तयारी सुरू आहे. चिमूर विधानसभा
क्षेत्रासाठी ते इच्छुक आहे. गेल्या दोन वर्षांपासून निवडणुकीच्या
अनुषंगाने त्यांची या क्षेत्रात कामे सुरू आहे. कॉंग्रेसही त्यांना तिकीट देण्यास इच्छुक असल्याचे समजते. 

जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्ष संध्याताई गुरनुले या पाचव्यांदा मोठ्या मतधिक्‍याने विजयी झाल्या. मूल, पोंभुर्णात माळी समाजाची एकगठ्ठा मते आहेत. गुरनुले याही माळी समाजाच्या आहेत. त्याही निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. 

डॉ. आसावरी देवतळे यांनी 2014 मध्ये वरोरा विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविली होती. त्यात त्या पराभूत झाल्या. आता पुन्हा त्यांनी तयारी सुरू केली आहे.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे हे आमदार बंटी भांगडिया यांचे समर्थक आहेत. तेही निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. संजय गजपुरे हेसुद्धा संधी मिळाल्यास निवडणूक लढवू शकतात.

लोकसभा निवडणुक भाजप-सेना आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्रित लढविली. हेच समीकरण येत्या विधानसभा निवडणुकीत राहिल्यास अनेकांचा हिरमोड होणार आहे. मात्र, 2014 प्रमाणे प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढल्यास यातील अनेकांची आमदारकी लढविण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. ही सर्व गणिते
येत्या काही महिन्यांत स्पष्ट होतील.
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com