दिवाकर रावतेंनी साधला भाजपवर नेम 

शिवसेनेशी भाजपशी युती नसून केवळ राज्य सरकारला पाठिंबा असल्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज स्पष्ट करीत भाजपवर नेम साधला.
दिवाकर रावतेंनी साधला भाजपवर नेम 

नागपूर : शिवसेनेशी भाजपशी युती नसून केवळ राज्य सरकारला पाठिंबा असल्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज स्पष्ट करीत भाजपवर नेम साधला. 

भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांच्या शोकप्रस्तावावर दिवाकर रावते यांनी आज विधान परिषदेत भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी पांडुरंग फुंडकर यांच्या नेतृत्वाबद्दल बोलताना भाजपवर नेम साधण्याची संधी घेतली. 1999 मध्ये युतीची सत्ता गेल्यानंतर पांडुरंग फुंडकर भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि त्यांनी शत-प्रतिशतचा नारा देत पक्षात चैतन्य आणण्याचा प्रयत्न केला. 2014 च्या विधानसभा निवडणुका मात्र युतीमध्ये नाही तर स्वतंत्रपणे लढल्या आहेत. त्यामुळे भाजप-सेनेची युतीने या निवडणुका लढलेल्या नाहीत. सध्याचे सरकार हे युतीचे सरकार नाही तर राज्य सरकारला शिवसेनेचा पाठिंबा आहे, असे सांगत रावते यांनी भाजप व सेनेच्या सध्याच्या नात्यावर भाष्य केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने 64 जागा जिंकल्यात. सत्ता स्थापनेसाठी भाजपाला शिवसेने पाठींबा दिला असल्याचे सांगत आमच्या पक्षाची युती नसल्याचा खुलासा केला. 

गोपीनाथ मुंडे आणि भाऊसाहेब फुंडकर यांनी भाजपाला गावागावात पोहचविण्याचा प्रयत्न केला. शेतकरी आणि शेतीसोबतच भाऊसाहेबांची नाळ जुळली होती. त्यामुळे कायम शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करीत होते. भाऊसाहेब मंत्री नव्हते तेव्हा आम्हाला त्यांची उणीव भासत होती. नंतर भाऊसाहेब मंत्री झाले आणि कृषी मंत्री झाल्याने त्यांनी जोमाने काम केले. ते अजात शत्रू होते. त्यांनी कधीही विरोधकांना टार्गेटही केले नाही, कायम सकारात्मक टीका केली. कधीही व्यक्तीगत टीका केली नसल्याचे सांगत आठवणीला रावते यांनी उजाळा दिला.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com