काँग्रेस नेते आपल्याच पोरांच्या विकासात मश्‍गुल : गडकरींची टीका

काँग्रेसचे नेते सत्तेत असताना त्यांनी केवळ आपल्या कुटुंबाचा व मुलांच्या भल्याचा विचार केला. या धोरणामुळे विदर्भ विकासापासून वंचित राहिला. भाजपा सत्तेत आल्यामुळे मिहानमध्ये उद्योग आले आणि विदर्भाच्या विकासाला गती मिळू लागली आहे, असा दावा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केला.
काँग्रेस नेते आपल्याच पोरांच्या विकासात मश्‍गुल : गडकरींची टीका

नागपूर : काँग्रेसचे नेते सत्तेत असताना त्यांनी केवळ आपल्या कुटुंबाचा व मुलांच्या भल्याचा विचार केला. या धोरणामुळे विदर्भ विकासापासून वंचित राहिला. भाजपा सत्तेत आल्यामुळे मिहानमध्ये उद्योग आले आणि विदर्भाच्या विकासाला गती मिळू लागली आहे, असा दावा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केला.

नागपूर मिहानमधील एचसीएल कंपनीच्या कॅम्पसचे उद्‌घाटन आज झाले. यावेळी नितीन गडकरी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ''विदर्भात काँग्रेसचे अनेक नेते झाले. त्यांना सत्ताही अनेक वर्षे मिळाली. परंतु काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याच कुटुंबाचा विकास केला. काँग्रेस नेत्यांनी विदर्भात शाळा, महाविद्यालये, मेडीकल कॉलेज, अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू केली. विदर्भात विकासाला गती देण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाही. मिहानमध्ये जागा खरेदी केल्या. मात्र उद्योग सुरू झाले नाही. यामुळे विदर्भाचा विकास खुंटला,''

''मिहानमधील गुंतवणूक मागे घेण्याच्या तयारीत अनेक उद्योजक होते. एचसीएलचे मालक शिव नाडर यांनीही गुंतवणूक न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांना संपूर्ण सोयीसुविधा देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर त्यांनी गुंतवणूक कायम ठेवली व हा प्रकल्प सुरू झाला," असेही त्यांनी सांगितले.

गेल्या चार वर्षांपासून केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आली आहे. यानंतर विदर्भाच्या विकासाला आता नवी दिशा मिळाल्याचे सांगून ते म्हणाले, ''गेल्या काही वर्षांपासून विदर्भाचा चेहरामोहरा बदलत आहे. विकासाचे अनेक प्रकल्प विदर्भात सुरू आहेत. विदर्भाच्या विकासाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यातून रोजगाराची निर्मिती होणार आहे. विदर्भातील बेरोजगारांना यातून रोजगार मिळेल."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com