यशोमती ठाकूर यांनी मुलांसह केले रक्तदान

रक्ताच्या नात्यातून आम्ही प्रेमाचं नातं वाढवतो. कोरोनाची लस आल्यामुळे ही लढाई निर्णायक टप्प्यावर आली आहे. रक्तदान आपण केले पाहिजे, रक्ताचा साठा हा गरजूंना महत्त्वाचा आहे, त्यामुळे सर्वांनी रक्तदान करावे.
Yashomati Thakur on blood donation
Yashomati Thakur on blood donation
Published on: 
Updated on: 

तिवसा (जि. अमरावती) ः राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी वडील स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त मुलगा यशवर्धन व मुलगी आकांशा समवेत तिवसा शासकीय ग्रामीण रुग्णालयात रक्तदान करून आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील जनतेनेही स्वतः पुढे येऊन रक्तदान चळवळ वाढविण्याचे आवाहन यशोमती ठाकूर यांनी यावेळी केले.

गेल्या नऊ वर्षांपासून माजी आमदार भैय्यासाहेब ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिवसा येथे सचिन गोरे मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यंदा भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त 180 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. वडिलांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री ठाकूर यांच्यासह त्यांच्या मुलांनीही रक्तदान केले. गेल्या अनेक वर्षांपासून वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असतो, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या. दरवर्षी प्रतिसाद वाढतो आहे. मागील वर्षापासून आम्ही कुटुंबासह रक्तदान करीत आहोत. 

रक्ताच्या नात्यातून आम्ही प्रेमाचं नातं वाढवतो. कोरोनाची लस आल्यामुळे ही लढाई निर्णायक टप्प्यावर आली आहे. रक्तदान आपण केले पाहिजे, रक्ताचा साठा हा गरजूंना महत्त्वाचा आहे, त्यामुळे सर्वांनी रक्तदान करावे, असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी केले. यावेळी आमदार बळवंत वानखडे, महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, विलास इंगोले, नगराध्यक्ष वैभव वानखडे, जिल्हा परिषद सभापती पूजा आमले, पंचायत समिती सभापती शिल्पा हांडे, उपसभापती शरद वानखडे, रोशनी पुनसे, नीलेश खुळे, अब्दुल सत्तार, कल्पना दिवे, बाजार समिती संचालक रवींद्र हांडे, सरपंच मुकुंद पुनसे, आयोजक सचिन गोरे, नरेंद्र विघ्ने, रितेश पांडव, प्रशिक शापामोहन आदी उपस्थित होते.

कोरोना योद्ध्यांचा सन्मान
भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त तिवसा येथील कार्यकर्त्यांच्यावतीने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. कोरोना काळात मैदानात उतरून विशेष कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशावर्कर यांचा सत्कार पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केला.
Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.