#कारणराजकारण - नंदुरबारमधून  भाजपच्या डॉ हीना गावित यांची ८६ हजार मतांची दणदणीत आघाडी; शिरपूर, नंदुरबार ने तारले

नंदुरबार लोकसभा मतदार संघातून भाजपच्या डॉ. हीना विजयकुमार गावित यांनी अकराव्या फेरीअखेर ८६६२१ हजार मतांची आघाडी घेतली आहे.त्यामुळे त्यांच्या विजयाची आत्ता फक्त औपचरिकता बाकी आहे.
#कारणराजकारण - नंदुरबारमधून  भाजपच्या डॉ हीना गावित यांची ८६ हजार मतांची दणदणीत आघाडी; शिरपूर, नंदुरबार ने तारले

नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदार संघातून भाजपच्या डॉ. हीना विजयकुमार गावित यांनी अकराव्या फेरीअखेर ८६६२१ हजार मतांची आघाडी घेतली आहे.  त्यामुळे त्यांच्या विजयाची आत्ता फक्त औपचरिकता बाकी आहे.

काँग्रेसचे अॅड. के सी पाडवी हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. हीना गावित यांना ५,८६,५०३ मते तर ऍड पाडवी यांना ४,९९,८८२ मते मिळाली आहेत. डॉ. हीना गावित यांना नंदुरबार, शिरपूर या विधानसभा मतदारसंघाणे गेल्यावेळेप्रमाणे पुन्हा एकदा साथ दिली आहे.   मतांची आकडेवारी जाहीर होताच डॉ हीना गावित यांनी फेसबुकद्वारे वर मतदारांचे आभार मानले आहेत. निकालाच कल समजताच भाजप कार्यकर्त्यांनी शहादा, नंदुरबार येथे एकाच जल्लोष केला.

विकासाला साथ दिली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नियोजनबद्ध विकासाला जनतेने साथ दिली आहे, नंदुरबार मतदारसंघाच्या विकासाला आणखी चालना देण्याची जबाबदारी मतदारांनी टाकत व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवू -डॉ हीना गावित, नंदुरबार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com