नाशिक : महाराष्ट्रातील पुणे, नाशिक आणि सांगली जिल्ह्यांची कृषी निर्यात धोरणांतर्गत द्राक्षे निर्यातीसाठी क्लस्टर म्हणून मान्यता आहे. थेट द्राक्षे निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांना याअंतर्गत केंद्राच्या वाणिज्य व उद्योग विभागाकडून मदत मिळणार आहे अशी माहिती खासदार डॉ. भारती पवार यांनी दिली.
यासंदर्भात "दिंडोरी'च्या खासदार डॉ. पवार यांनी लोकसभेत अतारांकीत प्रश्न केला होता. त्यासंदर्भात लिखीत उत्तर प्राप्त झाले आहे. द्राक्ष उत्पादकांना प्रत्यक्ष दर्शनी केंद्र सरकारमार्फत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सहाय्य मिळावे यासाठी त्यांचा पाठपुरावा होता.
त्या अनुषंगाने वाणिज्य व उद्योग मंत्रालयाद्वारे परदेशी द्राक्ष निर्यातीसाठी ही अखंडीत प्रक्रीया आहे. कृषी उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. वाणिज्य विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील ही एक स्वायत्त संस्था कृषी व प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (एपीडा) यांना कृषी निर्यात प्रोत्साहन देण्याचे काम सोपविण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील पुणे, नाशिक आणि सांगली जिल्ह्यांची कृषी निर्यात धोरणांतर्गत द्राक्षे निर्यात उत्पादनांसाठी क्लस्टर म्हणून ओळखली गेली. जे शेतकरी थेट द्राक्षे निर्यात करतात ते निर्यातदारांना द्राक्षाच्या निर्यातीसाठी उपलब्ध असणारी सर्व मदत घेऊ शकतात असे उत्तरात स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याना दिलासा मिळणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.