Nashik News : क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा आदर्श मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे. नेहमीच ते महात्मा फुले यांच्याविषयी बोलताना त्यांनी समाजसुधारक म्हणून केलेले कार्य व विचार तळागाळातील नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्नशील असतात. पण आता फुलेंवर बोलताना भावुक झाले. यावेळी बोलताना त्यांनी एक मोठी घोषणा केली.
सत्यशोधक चित्रपटाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या जीवनपटाची अतिशय उत्तम मांडणी केली आहे. क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपटाचा प्रीमियर पार पडला. सत्यशोधक चित्रपट राज्य सरकारच्या वतीने लवकरच टॅक्स फ्री करण्यात येईल, अशी घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
या शोसाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली. हा चित्रपट पाहताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) भावूक झाले होते. यावेळी मंत्री भुजबळ यांच्या हस्ते चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक व सहकलाकारांचा सत्कार करण्यात आला.
महात्मा फुले यांचे विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सत्यशोधक चित्रपट राज्य सरकारच्या वतीने लवकरच टॅक्स फ्री करण्यात येईल, अशी घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. यावेळी चित्रपटाचे निर्माते, विविध कलाकार, सहकलाकार माजी आमदार तुकाराम बिडकर (Tukaram Beedkar) यांच्यासह पदाधिकारी व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महात्मा फुले यांचा जीवनपट अतिशय उत्तम प्रमाणे सत्यशोधक चित्रपटात मांडणी करण्यात आली आहे. महात्मा फुले यांचं कार्य बघता एका सिनेमात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार मांडले जाऊ शकत नाहीत. तर प्रत्येक विषय घेऊन चित्रपट काढावे लागतील, असे त्यांनी सांगितले.
महात्मा फुले यांचा कुठल्याही धर्माच्या विरोधात नव्हता
कुठल्याही धर्माच्या विरोधात महात्मा फुले यांचा लढा नव्हता. जो पर्यंत हा इतिहास माहिती होत नाही तो पर्यंत आपल्याला समाज सुधारकांचे विचार आपल्याला तळागाळात पोहचवता येणार नाहीत. त्यासाठी सत्यशोधक चित्रपट हा अतिशय प्रभावी आणि परिणामकारक असून महाराष्ट्र भरातील सर्वांनी हा चित्रपट पाहावा, असे आवाहन छगन भुजबळ यांनी यावेळी केले.
(Edited by Sachin Waghmare)