महाआघाडीच्या निर्णयाआधीच नाशिक मतदारसंघावर 'भाकप'चा दावा 

राज्यात दोन्ही काँग्रेसचे महाआघाडीसाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, याआधीच भारतीय कम्युनिस्ट पक्षाने नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. या मतदारसंघात 'भाकप'चा विशेष प्रभाव नाही. मात्र, यामध्ये धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी स्पष्ट आहे. त्यामुळे हा दबावतंत्राचा भाग आहे की अन्य राजकारणाचा भाग याविषयी नवा पेच निर्माण उभा राहण्याची शक्‍यता आहे.
महाआघाडीच्या निर्णयाआधीच नाशिक मतदारसंघावर 'भाकप'चा दावा 
Published on
Updated on

नाशिक : राज्यात दोन्ही काँग्रेसचे महाआघाडीसाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, याआधीच भारतीय कम्युनिस्ट पक्षाने नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. या मतदारसंघात 'भाकप'चा विशेष प्रभाव नाही. मात्र, यामध्ये धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी स्पष्ट आहे. त्यामुळे हा दबावतंत्राचा भाग आहे की अन्य राजकारणाचा भाग याविषयी नवा पेच निर्माण उभा राहण्याची शक्‍यता आहे. 

भारतीय कम्युनिस्ट पक्षाने नाशिक लोकसभेसह नांदगाव, चांदवड, सिन्नर व नाशिकमधील प्रत्येकी एका अशा चार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा ठराव पक्षाच्या राज्य कमिटीला पाठविण्याचा निर्णय झाला आहे. आयटक कामगार केंद्रात बुधवारी व्ही. डी. धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय झाला. यावेळी राज्य सचिव राजू देसले यांनी मार्गदर्शन केले. भाकप, आयटकचे दिवंगत नेते ए. बी. वर्धन यांच्या तिसऱ्या स्मृदिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. 

त्यानंतर जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी परिषद किसान सभा भाकपतर्फे चांदवड येथे घेण्याचे ठरले. कार्ल मार्क्‍स यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त तालुकापातळीवर व्याख्यान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी भास्कर शिंदे, महादेव खुडे, ज्योती नटराजन, दत्तू तुपे, नामदेव राक्षे, छबू पुरकर, विजय दराडे, इसरार आझमी, विमल पोरजे आदी उपस्थित होते. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com