'नरेंद्र मोदी' चक्क मालेगाव बस स्थानकावर...

खामखेडा (नाशिक): भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तेही चक्क मालेगाव बसस्थानकावर बसची वाट पहात उभे हे विधान ऐकताच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण, यासह देशातील इतरही बस स्थानकावर प्रवाशांच्या गर्दीतील पंतप्रधानांचे फोटो सध्या सोशियल मीडियात झळकत असून लाखो लोकांचे मनोरंजन या फोटोतून घडत आहे.
'नरेंद्र मोदी' चक्क मालेगाव बस स्थानकावर...
Published on: 
Updated on: 

खामखेडा (नाशिक): भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तेही चक्क मालेगाव बसस्थानकावर बसची वाट पहात उभे हे विधान ऐकताच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण, यासह देशातील इतरही बस स्थानकावर प्रवाशांच्या गर्दीतील पंतप्रधानांचे फोटो सध्या सोशियल मीडियात झळकत असून लाखो लोकांचे मनोरंजन या फोटोतून घडत आहे.

कळवण सटाणा, मालेगाव बसस्थानकावर मालेगाव, निंबायती, सटाणा कातरवेल, कळवण बसची वाट पहाताना नरेंद्र मोदी पाहिल्यावर नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. तर हि आहे कसमादे भागातील युवकांनी फोटोशॉपमधील करामत. नरेंद्र मोदी बस स्थानकावर प्रवाशांच्या गर्दीत बसची वाट पहात आहेत, असा फोटो तयार करत हा फोटो व त्याखाली मिश्कील अशी पोस्ट सध्या सोशियल मीडियात फिरत आहे. या पोस्टने सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला आहे.

देशाचे पंतप्रधान तेही आपल्या भागातील बस स्थानकावर प्रवाशांच्या गर्दीत उभे रहात वाट पहाणारे नरेंद्र मोदींचे छायाचित्र सोशल मिडियात झळकत आहेत. खानदेशातील धुळे व जळगावकर युवकांनी नामी शक्कल लढवित डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत केलेल्या भाषणांना खानदेशच्या अहिराणी भाषेत डब करून, व्हिडीओ तयार केले आहेत. यामध्ये काही युवकांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या आवाज डब केला आहे. त्यात ट्रम्प हे आपल्या भाषणात खानदेशच्या ‘वरण-बट्टी व वांग्याची’ भाजीची स्तुती करताना दिसत आहेत. हे व्हिडीओ सध्या युट्यूब व व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून राज्यभरात पसरले आहे. त्यामुळे या व्हिडीओंनी सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारादरम्यानचे, विजयी झाल्यानंतरचे व काही पत्रकार परिषदेतील व्हिडीओ युवकांनी डब करत यात खानदेशातील अहिराणी भाषेत तयार केले आहेत. ट्रम्प यांचे असे अनेक अहिराणी भाषेतील व्हिडीओ डब करण्यात आले आहेत. त्याच बरोबर भारताचे पंतप्रधान ‘नरेंद्र मोदी व ट्रम्प’ भेटी दरम्यानचा व्हिडीओ देखील तयार करण्यात आला आहे. यामध्ये नरेंद्र मोदी देखील खानदेशच्या ‘वरण-बट्टी’चे कौतुक करत असून, भारताने अमेरिकेला ‘वरण-बट्टी’ निर्यात करण्याचा सल्ला देखील ट्रम्प या व्हिडीओत देत आहे. अशा एकाहून एक गंमतीशिर संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर एकमेकांना पोस्ट केले जात आहे. संबंधित व्हीडीओ व छायाचित्र सध्या सोशियल मिडियात चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.