नाशिक लोकसभेसाठी इच्छुकांचे प्राधान्य छगन भुजबळांना ! 

माजी खासदार देविदास पिंगळे, माजी खासदार समीर भुजबळ, व्यापारी बॅंकेचे ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, विष्णुपंत म्हैसधुने या इच्छुकांनी नेत्यांना राजकीय परिस्थितीची माहिती दिली.
Chhagan_bhujbal
Chhagan_bhujbal

नाशिक :  राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आज लोकसभा निवडणुकीसाठी आढावा घेतला. यावेळी नाशिकचे इच्छुक व त्यांच्या समर्थकांची गर्दी लक्षवेधी होती . यावेळी  इच्छुकांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांना उमेदवारी द्यावी अशी प्रस्तावना करीत,  ते इच्छुक नसल्यास आम्ही उमेदवारी करु अशी मांडणी उमेदवारीसाठी केली !  

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आज मुंबईत लोकसभा निवडणुक तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांसह सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीसाठी प्रदेश कार्यालयात नाशिकचे जवळपास शंभरहून अधिक पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते इच्छुक व त्यांचे समर्थक उपस्थित होते.

 दुपारी साडे तीनला नाशिक जिल्ह्याचा आढावा सुरु झाला. यावेळी माजी खासदार देविदास पिंगळे, माजी खासदार समीर भुजबळ, व्यापारी बॅंकेचे ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, विष्णुपंत म्हैसधुने या इच्छुकांनी नेत्यांना राजकीय परिस्थितीची माहिती दिली. यावेळी निवृत्ती अरिंगळे यांनी छगन भुजबळ उमेदवार असतील आम्ही त्यांचे स्वागत करु. ते नसल्यास आपली तयारी असल्याचे सांगीतले. त्यानंतर माजी खासदार देविदास पिंगळे यांनीही भुजबळ यांना उमेदवारी द्यावी. ते नसल्यास मला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली. त्यानंतर इतर दोघांनीही त्याचीच पुनरावृत्ती केली. 

 ज्येष्ठ नेते तुकाराम दिघोळे, श्रीराम शेटे, भारती पवार, प्रेरणा बलकवडे, नगरसेवक गजानन शेलार, रंजन ठाकरे, ऍड गोरखनाथ बलकवडे, मनोहर कोरडे, दिलीप खैरे, विक्रम कोठुळे, रमेश औटे आदींनी विविध सुचना केल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com