Nashik Politics : भाजपकडे मतं मागण्यासाठी मुद्दा तरी आहे का?

NCP leader Nitin Bhosle criticised on BJP : राष्ट्रवादीच्या नितीन भोसलेंचं टीकास्त्र, नाशिक शहरात ना प्रकल्प, ना तरुणांना रोजगार...
Nitin Bhosle
Nitin BhosleSarkarnama
Published on
Updated on

अरविंद जाधव

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यानंतर नितीन भोसले यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला आहे. भारतीय जनता पक्ष कोणत्या मुद्यांवरून मते मागणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या निमित्ताने माजी आमदार नितीन भोसले यांनी नाशिक शहरातील आमदारांच्या कामावरच बोट ठेवले आहे.

Nitin Bhosle
NCP Political War : नितीन भोसले भुजबळांना पुरून उरणार?

छगन भुजबळांना शह देण्याची जबाबदारी नितीन भोसलेंवर आहे. शिवाय भाजपला शिंगावर घेण्याचे काम ते करत आहेत. आता त्यांनी भाजपच्या नाशिक शहरातील आमदारांना थेट आव्हान दिले आहे. मागील दहा वर्षांत एकतरी प्रकल्प आणल्याचे भाजपाने दाखवून द्यावे. औद्योगिक क्षेत्रातील जागा छोटे प्लॉट करून विकल्या जात आहेत. अंबड सातपूर भागात तर लोकप्रतिनिधींनी एकही समाजपयोगी काम केलेले नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा सोडून भाजपा कोणत्या विकास प्रकल्पाच्या आधारे मते मागेल, असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नितीन भोसले यांनी भाजपला केला आहे.

सातपूर बस स्टॅण्डचे 2013-14 मध्ये माझ्याच हस्ते उद्घाटन केले होते. अवघ्या दीड कोटी रुपयांचे काम नंतर रेंगाळत पडले. परिणामी खर्चही वाढला. आज 10 वर्षांनी बस स्टॅण्ड सुरू झाले तरी त्याची अवस्था बिकटच आहे. सिटी बसेस बस स्टॉपमध्ये शिरत नाही, याकडे नितीन भोसले यांनी लक्ष वेधले.

सिडकोतील घरे मालकांच्या नावे ट्रान्सफर केली जातील, असे आश्वासन दिले होते. दहा वर्षांत या बाबत काहीच प्रगती झालेली नाही, असा आरोपही भोसले यांनी केला. पेलीकन पार्क हा महत्त्वाचा प्रकल्प आजही धुळखात पडला आहे. प्रकल्पाची संरक्षण भिंती बांधण्याचा खर्चही वाया जातो की काय, अशी परिस्थिती आहे.

वास्तविक अंबड भागात जळगाव, धुळे, नंदूरबार या उत्तर महाराष्ट्रातील रहिवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, त्यांना अंबड आणि शहरातील वाहतूक कोंडीचा सामना करत महामार्ग किंवा ठक्कर बाजार गाठावे लागते. लोकांच्या सोयीने जागा उपलब्ध करून आणि उत्तर महाराष्ट्रातून सुटणाऱ्या बसेस येथून सोडल्यास सर्वसामान्यांचा वेळ आणि पैसा वाचेल, याकडे भोसले यांनी लक्ष वेधले.

मात्र, याबाबत सत्ताधारी आमदार कायम उदासीन राहिले. मतदारसंघात विकासाच्या नावाने फक्त उद्घाटने झाली. निवडणुका आल्या की मोदी मोदी यांच्या नावाचा सत्ताधारी उदो उदो करतात. प्रत्यक्षात कामे करत नाहीत. ही बाब मतदारांच्या लक्षात आली असून, आगामी निवडणुकीपासून मतदाराच योग्य ते ठरवतील, असे सांगत भोसले यांनी भाजप आमदारांना चांगलेच सुनावले.

(Edited by Avinash Chandane)

Nitin Bhosle
Jalgaon Political : गिरीश महाजनांनी पळ काढू नये..! लोकसभेसाठी एकनाथ खडसेंचे आव्हान...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com