Jalgaon Political : गिरीश महाजनांनी पळ काढू नये..! लोकसभेसाठी एकनाथ खडसेंचे आव्हान...

Raver Loksabha : भाजपने प्रचंड छळ केला, त्यामुळे घरवापसी करण्याचा कोणताही विचार नाही.
Girish Mahajan, Eknath Khadse
Girish Mahajan, Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Political : गिरीश महाजन तब्बल सहा टर्म आमदार राहिले आहेत. त्यांनी आता लोकसभा निवडणुकीपासून पळ न काढता आपल्या विरोधात रावेर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी, असे थेट आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी दिले आहे. जळगाव येथे त्यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले, गिरीश महाजन (Girish Mahajan) मला लोकसभेला उभे रहा असे म्हणतात. त्यांनी ते मला सांगण्याची गरज नाही, माझी उमेदवारी पक्षाचे नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगाव येथे रावेर लोकसभा मतदार संघातून जाहिर केली आहे. जर हा मतदारसंघ महाविकास आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळाला तर आपणही निवडणूक लढविण्यास तयार आहोत.

Girish Mahajan, Eknath Khadse
Akola : आमदार म्हणाले; काय सांगता साहेब, माझ्या घराशेजारीच चालतो वरलीचा अड्डा!

आपणही पक्षाकडे इच्छा व्यक्त केलेली आहे. गिरीश महाजन यांनीही पक्षातर्फे रावेर मधून आपल्याविरूध्द निवडणुकीच्या मैदानात उतरावे त्यांनी लोकसभेच्या मैदानातून पळ काढू नये.

महाजनांची ईडी चौकशी करा...

माझ्या संपत्तीची सरकारने ईडी ,सीबीआय, चौकशी केली. माझ्या पत्नीची, मुलीची चौकशी केली. माझ्या जावयाला अटक केली. आजही मला त्रास दिला जात आहे. परंतु माझ्याविरूध्द काहीही सापडलेले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माझ्याप्रमाणे गिरीश महाजन यांचीही चौकशी करा. जामनेर येथील एका व्यापाऱ्याने महाजन यांची ईडीकडे तक्रार केली आहे, ती प्रलंबीत आहे. त्या आधारावर चौकशी करावी. त्यांच्याकडे जी आज संपत्ती आली आहे, ती कशी आली याची एकदा चौकशी करावीच, असे खडसे यांनी सांगितले.

तर रक्षा खडसें विरोधात लढणार...

रावेर मतदार संघातून भारतीय जनता पक्षाने खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आणि महाविकास आघाडीमधून आपल्याला राष्ट्रवादीने उमेदवारी दिली तर आपण रक्षा खडसे यांच्याविरोधातही लढणार आहोत. कारण त्यांचा पक्ष वेगळा आहे, माझा पक्ष वेगळा आहे. पक्ष म्हणून मी त्यांना मदत केलेली नाही, त्यांनीही कधी मला मदत केलेली नाही. त्यामुळे मी त्यांच्या विरोधात लढणार आहे.

घरवापसीचा विचार नाहीच...

भाजपचे नेते विनोद तावडे जुन्या भाजप नेत्यांना पक्षात जवळ करीत असल्याची चर्चा आहे. आपण पुन्हा भाजपमध्ये जाणार काय ? याबाबत बोलतांना ते म्हणाले, विनोद तावडे लोकसभेत भाजप उमेदवारांचा विजय व्हावा यासाठी पक्ष भक्कम करीत आहे, हे निश्‍चीत आहे.

त्यांचे आपले संबधही चांगले आहेत. परंतु आपला भाजपने प्रचंड छळ केला आहे. माझ्या चौकश्‍या केल्या आहेत. मला पक्षातून बाहेर जाण्यास भाग पाडले आहे. आजही मला त्रास दिला जात आहे. त्यामुळे आपला भाजपमध्ये घरवापसी करण्याचा कोणताही विचार नसल्याचे खडसे यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

Girish Mahajan, Eknath Khadse
Chhagan Bhujbal : नांदेडमध्ये छगन भुजबळांचा 'एल्गार', प्रकाश आंबेडकर यांना ही निमंत्रण...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com